राजस्थानमध्ये सत्ता राखण्याचे प्रयत्न

राजस्थानमध्ये सत्ता राखण्याचे प्रयत्न

सचिन पायलट यांच्या बंडाने निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढून, सत्ता राखण्यासाठी कॉँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. तर पायलट यांनी अजूनही माघार घेतलेली नाही. केंद्र सरकारने आयकर, ईडीद्वारे या खेळामध्ये आपणही असल्याचे सूचित केले.

राजस्थान काँग्रेस सरकारकडून प्रत्येक आमदाराला आयफोन
राजस्थानात स्थानिक निवडणुकीत काँग्रेसचा दमदार विजय
देशाला आज आणखी अनेक नसिरुद्दीन शहांची गरज का आहे?

आज सकाळी अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी कॉँग्रेस आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये आमदारांनी सरकारवर आपला विश्वास व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. या बैठकीला १०६  आमदार असल्याचे सांगण्यात आले. अशोक गेहलोत यांच्या समर्थनाचा ठरावही मंजूर करण्यात आला. बैठकीनंतर सर्व आमदारांना जयपूरच्या जवळ असणाऱ्या एका रिसॉर्टमध्ये एकत्रीतरीत्या नेण्यात आले.

सचिन पायलट यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे कॉँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हा कुटुंबामधला वाद आहे. पायलट याबाबत पक्षामध्ये चर्चा करू शकतात. भाजप हे सरकार पडण्यासाठे प्रयत्न करीत असून, त्यांचा हा उद्देश्य सफल होणार नाही. तसेच भाजपने यासाठी सीबीआय, ईडी, आयटीला कामाला लावल्याचेही त्यांनी सांगितले.

हरियाणामध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये पायलट यांच्याबरोबर १० ते १२ आमदार असल्याची दिवसभर चर्चा होती.

राजस्थानमधील सत्ता राखण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू असून, सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्यासाठी मनधरणीही केली जात असल्याचे समजते. राजस्थानमधील राजकीय गुंता सोडवण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यानी प्रयत्न सुरू केले आहेत.

आपण भाजप मध्ये जाणार नसल्याचे पायलट यांनी जाहीर केल्यानंतर पायलट याना सन्मानजनक वागणूक, उपमुख्यमंत्री पद आणि प्रदेश अध्यक्ष पद कायम ठेऊन, तीन आणखी मंत्रीपदे देण्यात येणार असल्याचा प्रस्ताव देण्यात आल्याचे वृत्त होते.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पायलट यांच्याशी चर्चा करीत असल्याचं वृत्त समोर आले होते, मात्र त्याची पुष्टी होऊ शकली नाही. सचिन पायलट यांनीही हे वृत्त फेटाळले.

आमदारांच्या घोडाबाजार प्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावल्यानंतर उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची नाराजी काल समोर आली होती. त्यानंतर पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व यांच्याबरोबर मतभेद विकोपाला गेल्याचे काँग्रेसच्या नेतृत्त्वाला दिल्ली येऊन सांगितले होते.

त्यानंतर आज सकाळी जयपूर येथे मुख्यमंत्री गेहलोत यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्याला पायलट गैरहजर होते.

राजस्थानात आमदार जुळवाजुळवी सुरू झाली असून, रात्री उशीर भारतीय ट्रायबल पक्षाने गेहलोत सरकारचा पाठिंबा काढून घेतला. पक्षाच्या दोन आमदारांना कोणालाही मतदान करू नये, असे पक्षातर्फे सांगण्यात आले.

दरम्यान आय टी आणि ईडीच्या वतीने अशोक गेहलोत यांच्या जवळच्या व्यापाऱ्यांवर आणि त्यांच्या मुंबई, जयपूर येथील कार्यालयांवर छापे टाकण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0