३१ जुलैला विधानसभा सत्र बोलवाः गेहलोतांची मागणी

३१ जुलैला विधानसभा सत्र बोलवाः गेहलोतांची मागणी

नवी दिल्लीः राजस्थानमधील पेचप्रसंग सोडवण्याचा प्रयत्न म्हणून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रांकडे ३१ जुलै रोजी विधानसभा सत्र बोलावण

सरकार बनवण्यात आत्मनिर्भरता कधी येणार?
राजस्थानमध्ये पायलट-गेहलोत गटात समेटाचे प्रयत्न?
अशोक गेहलोत भाजपला खिंडीत पकडतील का?

नवी दिल्लीः राजस्थानमधील पेचप्रसंग सोडवण्याचा प्रयत्न म्हणून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रांकडे ३१ जुलै रोजी विधानसभा सत्र बोलावण्यात यावे, असे पत्र पाठवले आहे. सोमवारी राज्यपालांनी सत्र बोलावण्याआधी मुख्यमंत्र्यांपुढे तीन अटी ठेवल्या, त्या अटींची पूर्तता करणार्या पत्रात गेहलोत यांनी ३१ जुलैला विधानसभा बोलावण्यात यावी असा आपला मुद्दा समाविष्ट केला आहे.

गेहलोत यांनी आपल्या पत्रात आपल्याकडे बहुमत असल्याचाही दावा केला आहे. आता या दाव्यावर राज्यपाल विचार करत असल्याचे सांगण्यात आले. जर सरकारला विधानसभेत शक्तीप्रदर्शन करायचे असेल तर अल्पावधीची नोटीस देऊन विधानसभा बोलावण्यात येऊ शकते असे राज्यपालांचे म्हणणे आहे. ही अप्रत्यक्ष काँग्रेसची मागणी मान्य केल्यासारखेच आहे.

मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक गेहलोत यांनी बोलावली होती. या बैठकीनंतर सरकारची पुढील रणनीती तयार झाली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0