‘ऑस्कर’नंतर हिंदी सिनेमे मिळणे बंद झाले: रसुल पूक्कुटी

‘ऑस्कर’नंतर हिंदी सिनेमे मिळणे बंद झाले: रसुल पूक्कुटी

मुंबई: ‘स्लमडॉग मिलेनिअर’ या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर हिंदी चित्रपटांत काम मिळणे बंद झाले, असे साउंड डिझायनर रसुल पूकुट्टी यांनी नुकते

बॉलीवुडमधून हजारो कोटींची वसुली – मलिक
झायराची एक्झिट
चित्रीकरण परवानगीः एक खिडकी योजना राज्यात लागू

मुंबई: स्लमडॉग मिलेनिअर या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर हिंदी चित्रपटांत काम मिळणे बंद झाले, असे साउंड डिझायनर रसुल पूकुट्टी यांनी नुकतेच उघड केले आहे. आम्हाला तुझी “गरज” नाही असे काही निर्मिती संस्थांच्या प्रतिनिधींनी सरळ सांगितल्याचेही पूकुट्टी म्हणाले. आपल्याला बॉलिवूडमध्ये काम करण्यापासून एक “गँग” रोखत आहे, असे विधान ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान यांनी केल्यानंतर लगेचच पूकुट्टी यांनीही त्यांचा अनुभव सर्वांसमोर मांडला आहे. गेल्या महिन्यात सुशांतसिंह राजपूतच्या धक्कादायक मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये इनसायडर व्हर्सेस आउटसायडर’ या वादाला तोंड फुटलेले असतानाच रहमान आणि पूकुट्टी यांच्या विधानांमुळे हा वाद आणखी गडद झाला आहे.

अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसची (एएमपीएएस) मान्यता प्राप्त केलेल्या कलाकारामुळे बॉलिवूडला असुरक्षित वाटू लागते, अशी टिप्पणी चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांनी नुकतीच रहमानचे विधान शेअर करून केली होती. त्यांच्या कमेंटला रिप्लाय म्हणून पूकुट्टी यांनी त्यांचा अनुभव मांडला. प्रादेशिक सिनेमाने मात्र आपली किंमत ओळखली, असेही पूक्कुटी यांनी नमूद केले आहे.

डॅनी बॉयल यांच्या स्लमडॉग मिलेनिअर या चित्रपटातील साउंड मिक्सिंगसाठी पूकुट्टी यांनी २००९ मध्ये अकॅडमी पुरस्कार प्राप्त केला होता. याच चित्रपटासाठी ओरिजिनल स्कोअर आणि ओरिजिनल साँग या विभागात रहमान यांना ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला होता.

हिंदी चित्रपटसृष्टीत कोणीही काम देत नसल्याने मी जवळपास कोसळण्याच्या स्थितीत होतो. त्यावेळी प्रादेशिक सिनेमाने मला आधार दिला,” असे पूक्कुटी यांनी नमूद केले आहे.

काही निर्मितीसंस्थांनी मला आम्हाला तुझी गरज नाही’ असे तोंडावर सांगितले, तरीही माझे या इंडस्ट्रीवर प्रेम आहे, कारण, या इंडस्ट्रीनेच मला स्वप्ने बघायला शिकवले,” असेही पूक्कुटी ट्विट्सच्या सीरिजद्वारे म्हणाले. काही मूठभर लोकांनी मात्र आपल्यावर कायम विश्वास दाखवला हेही त्यांनी सांगितले.

ऑस्कर मिळवल्यानंतर हॉलिवूडमध्ये बस्तान बसवणेही अशक्य नव्हते पण आपण तसे केले नाही, असेही पूक्कुटी म्हणाले.”

माझ्या भारतातील कामानेच मला ऑस्कर मिळवून दिला. मला एमपीएसईसाठी (मोशन पिक्चर साउंड एडिटर्स) सहा वेळा नामांकन मिळाले तेही भारतात केलेल्या कामामुळेच. तुम्हाला खाली खेचणारे लोक कायमच असतात पण माझा जवळच्या लोकांवर विश्वास आहे!”

शिवाय ऑस्कर प्राप्त करणाऱ्यांना प्रत्येकाला “कर्स ऑफ ऑस्कर” सहन करावा लागतो हे आपल्या बरेच उशिरा लक्षात आले, असेही पूक्कुटी यांनी स्पष्ट केले.

मी माझ्या अकॅडमी मेंबर्स मित्रांसोबत यावर चर्चा केली तेव्हा मला लक्षात आले की हा सर्वांचाच अनुभव आहे. मी जेव्हा शिखरावर होतो तेव्हा या टप्प्याचा आनंद लुटत होतो. मग अचानक लोक नाकारू लागतात तेव्हा वास्तवाची जाणीव होते.”

ऑक्सरचा शापआता धुऊन निघाला आहे. आम्ही सगळे बरेच पुढे आलो आहे. नेपोटिझमबद्दलची चर्चा ज्या दिशेने जात आहे, ते मलाही आवडत नाही आहे. तेव्हा जरा शांतपणे विचार करू. मला काम न देणाऱ्या कोणालाही मला दोष द्यायचा नाही,” असे सांगून, ‘नेपोटिझम हे सर्वांत थिल्लर आणि कल्पनाशून्य भ्रष्टाचार आहे’ अशी टिप्पणी पूक्कुटी यांनी केली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0