जनतेशी थेट संवाद हवा – सोनिया गांधी

जनतेशी थेट संवाद हवा – सोनिया गांधी

नवी दिल्ली : सोशल मीडियावर अधिक आक्रमक असणे व त्यावर पूर्णपणे अवलंबून चालणार नाही तर प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने जनतेशी थेट संवाद साधला पाहिजे, अ

सुभाष चंद्रा यांचा पराभव
दिल्ली निकालावरून काँग्रेसमध्ये परस्परविरोधी मते
इच्छाधारी विश्लेषकांच्या भाऊगर्दीत…

नवी दिल्ली : सोशल मीडियावर अधिक आक्रमक असणे व त्यावर पूर्णपणे अवलंबून चालणार नाही तर प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने जनतेशी थेट संवाद साधला पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गुरुवारी केले. त्या काँग्रेस मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांशी बोलत होत्या.

म. गांधी, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर यांच्या विचारधारेच्या मदतीने आपल्याला सद्य परिस्थितीवर लढावे लागणार आहे आणि जनतेची काँग्रेसकडून अशी अपेक्षाही आहे. यासाठी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने नीडरपणे रस्त्यावर उतरले पाहिजे, शहरे, खेडी, गावे येथे जाऊन लोकांशी संवाद साधला पाहिजे. आपल्याकडे लोकांचे सामाजिक- आर्थिक मुद्दे असणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.

लवकरच तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असून या राज्यांमधील परिस्थिती पक्षासाठी आव्हानात्मक आहे. अशा परिस्थिती पक्षाच्या हितापेक्षा अन्य कशालाही महत्त्व न देता आपण लढलो तर आपल्यापासून यश दूर नाही. त्यासाठी आपल्याला लोकहिताचे जाहीरनामे तयार करून ते पूर्ण केले पाहिजे तरच जनता आपल्या पाठीशी राहिल, असेही त्या म्हणाल्या.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपद आल्यानंतर सोशल मीडियात काँग्रेस बरीच आक्रमक झाली होती. काँग्रेसमधील सोनिया गांधी यांच्यापासून बरेच ज्येष्ठ नेते सोशल मीडियापासून दूर आहेत. सोनिया गांधी यांचे स्वत:चे ट्विटर खातेही नाही. पण राहुल गांधी, प्रियंका गांधी, व अन्य नवी तरुण पिढी सोशल मीडियावर सतत सरकारच्याविरोधात आवाज उठवत असते.

मूळ बातमी

सोनिया गांधी यांचे ट्विटर खाते नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0