वर्षभराचे वेतन मुकेश अंबानींनी नाकारले

वर्षभराचे वेतन मुकेश अंबानींनी नाकारले

मुंबई : कोरोना विषाणू साथीचे उद्योग जगतावर आलेले संकट पाहता देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती व रिलायन्स इंडस्ट्रिजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी पुढील ए

कोरोना : असंघटित क्षेत्राला वाचवण्याची नितांत गरज
न्यूझीलंडमध्ये कोरोनाची साथ आटोक्यात?
या वर्षात एड्स, मलेरियापेक्षा कोविडचे मृत्यू अधिक

मुंबई : कोरोना विषाणू साथीचे उद्योग जगतावर आलेले संकट पाहता देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती व रिलायन्स इंडस्ट्रिजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी पुढील एक वर्ष कोणतेही वेतन घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर कंपनीने वार्षिक १५ लाख रु. पेक्षा अधिक पगार असलेल्या आपल्या कर्मचार्यांच्या वेतनात १० ते ५० टक्के कपात करण्याचाही निर्णय घेतला आहे.

रिलायन्स व्यवस्थापनाने आपल्या हायड्रोकार्बन विभागातील हजारो कर्मचार्यांना एक संदेश पाठवून या निर्णयाची माहिती दिली. कंपनीने कर्मचार्यांचा बोनसही न देण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीत वित्तीय वर्षाच्या तिसर्या तिमाहीत बोनस दिला जातो.

आपल्या विस्तृत संदेशात रिलायन्स व्यवस्थापनाने कोरोनाने उद्भवलेल्या जागतिक संकटाने रिफायनरी उद्योगावर मोठा प्रभाव पडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कंपनीच्या विविध भागांमध्ये वेतन कपातीचा निर्णय घेणे गरजेचे झाल्याचे कंपनीने म्हणणे आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक असलेल्या मुकेश अंबानी यांचा वार्षिक पगार हा १५ कोटी रु. आहे. तो सर्व पगार ते कंपनी फंडाकडे देणार आहेत. त्याचबरोबर ज्या कर्मचार्यांचा वार्षिक पगार १५ लाख रु. पेक्षा कमी आहे त्यांच्या पगारात कपात करण्यात आलेली नाही. पण त्याहून अधिक पगार असलेल्या कर्मचार्यांच्या वेतनात १० टक्के कपात करण्यात आली आहे.  तर कंपनीचे कार्यकारी संचालक, कार्यकारी समितीतील सदस्य यांच्या वेतनात ३० ते ५० टक्के इतकी कपात केली जाणार आहे.

मुकेश अंबानी २००८-०९पासून वार्षिक १५ कोटी रु. वेतन घेत आले आहेत. त्यात कोणताही बदल झालेला नाही.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0