निवासी डॉक्टरांना शुल्क माफी, प्रोत्साहन भत्ता मिळणार

निवासी डॉक्टरांना शुल्क माफी, प्रोत्साहन भत्ता मिळणार

मुंबई: गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी म्हणजेच निवासी डॉक्टर कोविड काळात अहोरात्र काम करीत आ

अज्ञान्यांच्या हातात डिजिटल मीडियाचे शस्त्र!
तबलिगी आणि कोरोना उद्रेक- काही अनुत्तरित प्रश्न
कोरोनाचा आकड्यांचा खेळ

मुंबई: गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी म्हणजेच निवासी डॉक्टर कोविड काळात अहोरात्र काम करीत आहे. या निवासी डॉक्टरांना वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क माफी आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

मंत्रालयात महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटनेने (सेंट्रल मार्ड)च्या पदाधिकाऱ्यांनी अमित देशमुख यांची भेट घेतली. यावेळी देशमुख म्हणाले, गेल्या दीड वर्षापासून निवासी डॉक्टर रात्रं-दिवस कोविड-१९ परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काम करीत आहे. त्यामुळे या डॉक्टरांना शैक्षणिक शुल्क माफी आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक असून याबाबत तसा प्रस्ताव तयार करण्यात येईल. वैद्यकीय संचालकांमार्फत प्रस्ताव सादर करुन वित्त विभागाला मंजुरीसाठी पाठविण्यात येईल.

आपल्या घरापासून दूर राहत अनेक विद्यार्थी वसतीगृहांमध्ये राहून वैद्यकीय शिक्षण घेत असतात. अशा वेळी वसतीगृहांची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे. त्यामुळेच वसतीगृहांचा प्रश्न सोडविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण संचालक याबाबत माहिती घेतील, असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.

सेंट्रल मार्डमार्फत शैक्षणिक शुल्क माफी, कोविड काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना देण्यात येत असलेल्या प्रोत्साहन भत्त्याप्रमाणे राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता देणे, वसतीगृहांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करणे, निवासी डॉक्टरांची सुरक्षितता या मागण्यांचे निवेदन यावेळी देशमुख यांना देण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0