बीजिंगः एक वर्षांपूर्वी चीनमधील वुहान शहरात कोरोना महासाथीवर नियंत्रण आणण्यात आले होते. पण आता पुन्हा या शहरात कोरोनाचे वेगाने संक्रमण होत असल्याचे दि
बीजिंगः एक वर्षांपूर्वी चीनमधील वुहान शहरात कोरोना महासाथीवर नियंत्रण आणण्यात आले होते. पण आता पुन्हा या शहरात कोरोनाचे वेगाने संक्रमण होत असल्याचे दिसून आल्यानंतर प्रशासनाने सुमारे १ कोटी १० लाख लोकसंख्येच्या या शहरातील नागरिकांची पुन्हा तपासणी सुरू केली आहे. या सर्व नागरिकांची न्यूक्लिक ऍसिड चाचणी केली जाणार आहे. सोमवारी शहरात ७ श्रमिकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. वर्षभरानंतर हे संक्रमण आढळून आले आहे. वुहानमधील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनची अंमलबजावणी सक्तीने केली जात आहे.
मंगळवारी संपूर्ण चीनमध्ये कोरोनाचे नवे ६१ रुग्ण आढळून आले आहेत. चीनच्या अनेक शहरांमध्ये कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आढळून आला आहे.
नानजिंग या शहराच्या विमानतळावरील साफसफाईचे काम करणार्या काही कर्मचार्यांना कोरोनाची लागण झालेले आढळून आले आहे. तर नानजिंग शहराच्या नजीकचे यांगझोऊ शहरात कोरोनाचे नवे ४० रुग्ण आढळले आहे. त्यामुळे येथे नागरिकांना घरीच राहण्यास सांगितले आहे. यांगझोऊची लोकसंख्या १ कोटी ३० लाख रु. इतकी आहे. या शहरात प्रत्येक घरातील एकाच व्यक्तीला घराबाहेर पडण्याची व जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यास परवानगी दिली आहे.
राजधानी बीजिंगमधील लाखो नागरिकांची कोरोना चाचणी घेण्याचे काम सुरू झाले आहे. प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणत काही इमारती सील केल्या आहेत, क्वारंटाइनवर भर दिला जात आहे.
चीनच्या हुनान प्रांतातील झांगजिएजी व झुझोऊ या शहरातही नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध आणले आहेत. या शहरांची लोकसंख्या २० लाखाच्या आसपास आहे.
दरम्यान चीनमध्ये कोरोनाचे एकूण रुग्ण ९३,१९३ इतके आढळून आले असून १,५५७ रुग्णांवर उपचार झाले आहेत व ४,६३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
चीनने १ अब्ज ६० कोटी लसींचे खुराक दिल्याचा दावा केला आहे.
मूळ बातमी
COMMENTS