संरक्षण खात्याकडून उपकरणांच्या आयातीस बंदी

संरक्षण खात्याकडून उपकरणांच्या आयातीस बंदी

नवी दिल्लीः ‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमेंतर्गत देशाच्या संरक्षण दलातील १०१ उपकरणांच्या आयातीवर सरकारने बंदी घातली आहे. या बंदीमुळे देशात आता तोफ, रायफल

पिगॅससच्या कंपनीशी कोणताही व्यवहार नाहीः संरक्षण खाते
चीनचाच भारताला खरा धोकाः रावत
चीनची नवी तिबेट रेल्वे अरुणाचल नजीक येणार

नवी दिल्लीः ‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमेंतर्गत देशाच्या संरक्षण दलातील १०१ उपकरणांच्या आयातीवर सरकारने बंदी घातली आहे. या बंदीमुळे देशात आता तोफ, रायफल, परिवहन विमाने, रडार यांची निर्मिती होणार आहे. ही बंदी २०२० ते २०२४ या काळासाठी आहे व तिची अंमलबजावणी टप्प्या टप्प्याने केली जाणार आहे.

कोविड-१९ या संकटकाळात ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत या मोहिमेची घोषणा केली होती. चिनी वस्तूंची आयात रोखणे व देशात आवश्यक असणार्या वस्तूंचे उत्पादन करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

रविवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण दलाकडून आयात केलेल्या १०१ वस्तूंची यादीच प्रसिद्ध करून या वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाने संरक्षण उत्पादन उद्योगांनाही बळ मिळेल, असा त्यांनी दावा केला.

संरक्षण दल, सार्वजनिक व खासगी उद्योजकांशी संरक्षण खात्याने विचारविनिमय करून हा निर्णय घेतला असे राजनाथ सिंह म्हणाले.

भारतीय भूदल, हवाई दल व नौदलाने एप्रिल २०१५ ते एप्रिल २०२० या कालावधीत २६० योजनांअंतर्गत संरक्षण वस्तू आयातीचे ३.५ लाख कोटी रु.ची कंत्राटे बाहेरच्या कंपन्यांना दिली आहेत. आता ही कंत्राटे बंद करून पुढील ६-७ वर्षे देशातील उद्योगांना देण्यात येतील व ही कंत्राटे ४ लाख कोटी रु.ची असतील, असे सिंह यांनी सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0