मोदी झिंदाबाद न म्हंटल्याने मुस्लिम व्यक्तिस मारहाण

मोदी झिंदाबाद न म्हंटल्याने मुस्लिम व्यक्तिस मारहाण

नवी दिल्लीः राजस्थानमधील सिकार जिल्ह्यात एका ५२ वर्षीय मुस्लिम रिक्षाचालकाने मोदी झिंदाबाद व जय श्रीराम म्हटले नाही म्हणून बेदम मारहाण करण्यात आली. या

लॉकडाऊनमध्ये ते चालले २९०० किमी
‘भारत-चीन तणावाबाबत १७ प्रश्नांना फेटाळले’
आता पीटीआयला ८४ कोटी रु.च्या दंडाची नोटीस

नवी दिल्लीः राजस्थानमधील सिकार जिल्ह्यात एका ५२ वर्षीय मुस्लिम रिक्षाचालकाने मोदी झिंदाबाद व जय श्रीराम म्हटले नाही म्हणून बेदम मारहाण करण्यात आली. या रिक्षाचालकाचे नाव गफ्फार अहमद कच्छवा असे असून त्यांचे दात तुटले आहेत, चेहरा जबर सुजला आहे व गालावर मारहाणीचे व्रण दिसून आले आहेत. ही घटना शुक्रवारी घडली.

कच्छवा यांचा पुतण्या शाहीदने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार त्याचे काका पहाटे ४ वाजता एका प्रवाशाला सोडून परत येत असताना तंबाखू आहे का, असे एका कारमधील काहींनी विचारले. त्यानंतर गफ्फार कच्छवा यांनी कारमधल्या तरुणांना तंबाखू दिली असता ती त्यांनी घेण्यास नकार दिला व गफ्फार यांना मोदी झिंदाबाद व जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सांगितले.

त्याला गफ्फार यांनी नकार देताच त्यांच्या कानशिलात मारण्यात आले. गफ्फार यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना जगमालपुरा येथे गाठले व त्यांना पुन्हा घोषणा देण्यास सांगितले. त्यांनी गफ्फार यांचे पाकिट, घड्याळ व ७०० रु. काढून घेतले. त्यांची दाढी ओढली, त्यांना लाथा मारल्या व बुक्क्या मारण्यास सुरूवात केली. यात गफ्फार यांचे तीन दात पडले व डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. मारहाण झाल्यानंतर आरोपींनी गफ्फार यांना पाकिस्तानात जाण्यास सांगितले.

दरम्यान गफ्फार यांनी पोलिसांमध्ये फिर्याद नोंदवली. त्यानंतर शनिवारी शंभूदयाल जाट (३५) व राजेंद्र जाट (३०) या दोघांना अटक केली. या दोघांनी मद्यप्राशन केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0