शोपियन एन्काउंटरः मुलाचे शव द्या; वडिलांची मागणी

शोपियन एन्काउंटरः मुलाचे शव द्या; वडिलांची मागणी

श्रीनगरः ‘माझ्या घरातल्या काहींनी भारतीय लष्कराची सेवा केलीय, या लष्कराच्या हातून माझा मुलगा ठार होणे याचे मला अधिक दुःख व वेदना होतातेय. माझ्या मुलाच

बनावट एन्काउंटर : अराजकाचे राज्य
एन्काउंटर कायद्याप्रमाणेच : सायबराबाद पोलिस कमिशनर
उन्मादी समाजमन…आत्मघाताच्या वाटेवर!

श्रीनगरः ‘माझ्या घरातल्या काहींनी भारतीय लष्कराची सेवा केलीय, या लष्कराच्या हातून माझा मुलगा ठार होणे याचे मला अधिक दुःख व वेदना होतातेय. माझ्या मुलाचे शव आमच्या ताब्यात द्या,’ अशी मागणी शोपियन एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या तीन युवकांमधील अब्रार अहमद याचे वडील मोहम्मद युसूफ चौहान यांनी केली आहे.

गेल्या १६-१७ जुलैच्या रात्री शोपियन येथे लष्कराशी केलेल्या एन्काउंटरमध्ये तीन दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आले होते पण हे तीन दहशतवादी नसून आमच्या घरातील सदस्य होते आणि ते मजूर कामासाठी शोपियन येथे आले होते, असा दावा मोहम्मद युसूफ यांनी केला होता.

मोहम्मद युसूफ यांच्या कुटुंबियांनी ठार मारलेल्या तीन दहशतवाद्यांचे फोटो पाहिले होते. ते फोटो पाहून हे आमच्या घरातील सदस्य असल्याचा दावा युसूफ यांच्या कुटुंबियांनी केला होता पण लष्कर व पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे जाहीर केले होते.

राजौरीहून द वायरशी फोनवरून बोलताना युसूफ यांनी आपल्या मुलाचा झालेल्या मृत्यूवरून धक्का बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्या कुटुंबाने भारतीय लष्कराची, पोलिसांची सेवा केली आहे, त्यांच्या हातून माझा मुलगा मारला जाणे हे वेदना देणारे असल्याचे युसूफ म्हणाले.

युसूफ यांचा भाऊ मदाद हुसैन हे भारतीय लष्करातून सन्माननीय कॅप्टन म्हणून निवृत्त झाले आहेत, दुसरा भाऊ मोहम्मद बशीर हे हवालदार म्हणून निवृत्त झाले आहेत. तर चार पुतणे लष्कर व निमलष्कर दलात कार्यरत असल्याचे युसूफ यांनी सांगितले.

माझ्या घरातले हे तिघे जण चुकीच्या मार्गावर असते तर त्यांनी मला तसे सांगितले असते, त्यांना मी योग्य तो मार्ग समजावून सांगितला असता. मी त्यांना लष्कराच्या ताब्यात देऊन यांना ठार मारा असे सांगितले असते. या तिघांचे सर्व मोबाइल कॉल रेकॉर्ड तपासावेत. ते जर दहशतवादी कृत्यात असतील तर मला त्याची शिक्षा द्यावी. ती मुले निष्पाप होती, असे युसूफ यांचा दावा आहे.

डीएनए तपासणार

दरम्यान एन्काउंटरमध्ये ठार मारण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांचे डीएनए नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतील असे काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले. त्याच बरोबर या एन्काउंटरची चौकशी करण्यासाठी पोलिसांच्या दोन टीम तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर गुरूवारी राजौरीहून युसूफ यांच्या घरातल्यांचे डीएनए नमुने घेण्यात आले आहेत.

डीएनए नमुन्याबाबत जम्मू व काश्मीर पोलिसांची कामगिरी समाधानकारक नाही. मार्च २०००मध्ये अनंतनाग येथे पाथरीबाल येथे एकाच घरातल्या ५ जणांना दहशतवादी म्हणून ठार मारण्यात आले. या घटनेची चौकशी करताना डीएनए नमुन्यात अदलाबदली करण्यात आल्याचे आरोप झाले होते.

उमेर मकबूल, हे काश्मीरमधील मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0