सगळं बदलेल पण भारत हिंदू राष्ट्रच – सरसंघचालक

सगळं बदलेल पण भारत हिंदू राष्ट्रच – सरसंघचालक

नवी दिल्ली : आपण सर्वकाही बदलू शकू. सर्व विचारसरण्या बदलू शकतात पण एक गोष्ट बदलली जाऊ शकत नाही, ती म्हणजे ‘ भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे’, असे विधान र

‘भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने अशक्य’
आठशे वर्षांच्या संवादाची पार्श्वभूमी
कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती

नवी दिल्ली : आपण सर्वकाही बदलू शकू. सर्व विचारसरण्या बदलू शकतात पण एक गोष्ट बदलली जाऊ शकत नाही, ती म्हणजे ‘ भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे’, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी एका पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान केले.

अभाविपचे ज्येष्ठ प्रचारक सुनील आंबेकर यांच्या ‘द आरएसएस : रोडमॅप फॉर 21 सेंच्युरी’, या पुस्तकाचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना भागवतांनी हिंदुत्वाचा नारा देत हनुमान, छ. शिवाजी व संघाचे संस्थापक केशव हेडगेवार यांचे नाव एकाच वेळी घेतले.

भागवत यांनी भारत हे एक हिंदू राष्ट्रच असल्याचा दावा करत या देशात सर्व काही बदलू शकते पण हा देश ‘हिंदू राष्ट्र’ असल्याचा पुनरुच्चार केला. आम्ही हिंदू तयार केले नाहीत. ते हजारो वर्षांपासून येत आहेत. देश, काळ, व परिस्थिती यांच्यासोबत ते येत आहेत. जे या मातृभूमीला मानतात, त्याच्यावर प्रेम करतात त्यांच्यापैकी एकही जिवंत असेल तोपर्यंत हिंदू जिवंत आहे, असे ते म्हणाले.

संघात एकच विचारधारा सतत पुढे जात आहे, ती म्हणजे जो कोणी या भारताची भक्ती करतो तो हिंदू आहे, असे ते म्हणाले.

भागवतांनी या देशात भाषा, धर्म, पंथ, प्रांत पहिल्यापासून असल्याचे सांगत बाहेरून आलेल्यांनी या देशाचा स्वीकार तसेच या देशानेही त्यांना आपल्यात सामावून घेतले. आम्ही सर्वांना आपलेच मानतो असे सांगितले.

‘समलैंगिकता वेदात नाही’

भागवतांनी समलैंगिकतेचा मुद्दा आपल्या भाषणात घेतला. ते म्हणाले, समलैंगिकतेचा प्रश्न हा चर्चेतून सोडवला जातो. महाभारत, प्राचीन सैन्यात समलैंगिकतेची उदाहरणे सापडतात पण वेदात नाहीत.

असहमतीच्या मुद्द्यावर जोर देत भागवतांनी आपल्याकडे मतभेद होऊ शकतात पण मनभेद नाही असेही स्पष्ट केले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0