‘१९८९-२०२१ दरम्यान ८९ काश्मीर पंडितांची हत्या’

‘१९८९-२०२१ दरम्यान ८९ काश्मीर पंडितांची हत्या’

नवी दिल्लीः १९९०च्या हिंसाचारामुळे काश्मीर खोऱ्यातून १ लाख ५४ हजार नागरिकांनी पलायन केले होते. यामध्ये ८९ टक्के लोकसंख्या हिंदूंची होती. तर ९०च्या दशक

हिंदुत्ववादी हुकूमशाहीच्या मर्यादा
‘हाऊडी मोदी’ : मोदींसाठी लाभदायक, पण भारतासाठी?
सुशांत प्रकरणः फेक ट्विट ; ‘आज तक’ला दंड

नवी दिल्लीः १९९०च्या हिंसाचारामुळे काश्मीर खोऱ्यातून १ लाख ५४ हजार नागरिकांनी पलायन केले होते. यामध्ये ८९ टक्के लोकसंख्या हिंदूंची होती. तर ९०च्या दशकात हिंसाचारात मरण पावलेल्यांमध्ये अन्य धर्माचे नागरिक अधिक असल्याची आकडेवारी माहिती अधिकार अर्जातून मिळाली आहे.

काश्मीर पंडितांच्या विस्थापितांवर एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाल्यानंतर उन्मादाचे वातावरण देशभरात तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर हरियाणातील समालखा येथे राहणारे माहिती अधिकार कार्यकर्ते पीपी कपूर यांनी जम्मू काश्मीर पोलिस व उपराज्यपालांकडे गेल्या वर्षी माहिती अर्ज दाखल केला होता. या अर्जात त्यांनी काश्मीर पंडितांविरोधात झालेली हिंसा, त्यांचे विस्थापन व पुनर्वसन या संदर्भात माहिती मागवली होती. कपूर यांच्या विविध प्रश्नांना उत्तर देताना १९९० ते २०२१ या काळातील काश्मीर खोऱ्यातील सामाजिक परिस्थितीवर प्रकाश पडतो.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार ९०च्या दशकात दहशतवाद वाढल्यानंतर हिंसा व धमक्यांमुळे सुमारे दीड लाख नागरिकांनी विस्थापन केले. त्यातील ८८ टक्के हिंदू होते तर १२ हजार मुस्लिमांनाही काश्मीर खोरे सोडावे लागले. पण हिंसाचारात मरण पावलेल्यांमध्ये हिंदूंपेक्षा अन्य धर्माचे नागरिक होते.

दहशतवाद्यांनी १९९० ते २०२१ या काळात १,७२४ नागरिकांची हत्या केली त्यामध्ये ८९ काश्मीर पंडित असून १,६३५ नागरिक हे अन्य धर्माचे असल्याचे कपूर यांचे म्हणणे  आहे. कपूर यांनी दावा केला आहे की, काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचा बळी ठरलेल्यांमध्ये सर्वाधिक नागरिक मुस्लिम असून काश्मीर पंडित दहशतवादाचे सर्वाधिक बळी ठरल्याचे दाखवणे योग्य नसल्याचे कपूर यांचे म्हणणे आहे.

पण १९८९ मध्ये काश्मीरमध्ये १०० हून अधिक काश्मीर पंडितांना ठार मारण्यात आल्याची आकडेवारी कपूर यांच्या माहितीत नाही.

द हिंदूसाठी २०१०मध्ये शुजात बुखारी यांनी रिपोर्ट केला होता, त्यानुसार १९८९नंतर काश्मीर खोऱ्यात २१९ काश्मीर पंडितांची हत्या करण्यात आल्याची नोंद आहे. तर माजी महसूल मंत्री रमण भल्ला यांनी जम्मू काश्मीर विधानसभेत काश्मीर पंडितांविषयी प्रश्न विचारला असता १९८९ ते २००४ या काळात काश्मीर खोऱ्यात २१९ पंडितांची हत्या झाल्याचे सांगण्यात आले.

अर्ध्याहून अधिक विस्थापितांना कोणतीही मदत नाही

कपूर यांनी विस्थापितांना मिळालेल्या सरकारी मदतीविषयी माहिती मागितली असता, २३,०९१ कुटुंबे व ८३,९४३ नागरिकांना कोणतीही सरकारी मदत मिळाली नसल्याचे दिसून आले. या मध्ये ८१,४४८ हिंदू, ९४९ मुस्लिम, १,५४२ शीख व ४ अन्य धर्मीयांचा समावेश आहे.

विस्थापितांना दरमहा ३,२५० रु, ९ किलो तांदूळ, २ किलो गव्हाचे पीठ, १ किलो साखर द्यावी अशी तरतूद आहे.

मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर किती काश्मीर पंडितांचे जम्मू व काश्मीरमध्ये विस्थापन केले याची कोणताही माहिती नरेंद्र मोदी यांचे केंद्र सरकार व जम्मू-काश्मीर प्रशासनाने अद्याप दिली नाही, असे कपूर यांचे म्हणणे आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0