भारतीय क्रीडा प्राधिकरणात लैंगिक छळाच्या तमाम तक्रारी

भारतीय क्रीडा प्राधिकरणात लैंगिक छळाच्या तमाम तक्रारी

नवी दिल्ली : शहरातल्या निजामुद्दीन भागात राहणाऱ्या एका क्रिकेटपटू मुलीने आपल्या प्रशिक्षकाकडूनच लैंगिक छळ होत असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर दिल्ली प

कुणाल कामरा, रचिता तनेजाला सुप्रीम कोर्टाची नोटीस
तीन प्रकारच्या हुकूमशाहींविरुद्ध आंबेडकरांनी दिलेले इशारे
नवं भागवत पुराण

नवी दिल्ली : शहरातल्या निजामुद्दीन भागात राहणाऱ्या एका क्रिकेटपटू मुलीने आपल्या प्रशिक्षकाकडूनच लैंगिक छळ होत असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्या प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला. हे प्रकरण उघडकीस आले ते त्या तरुणीच्या ट्विटवरील आवाहनामुळे. बुधवारी त्या मुलीने आपला प्रशिक्षक लैंगिक छळ करत असल्याची तक्रार भाजपचे खासदार व माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ट्विटवर उद्देशून केली. त्यानंतर ताबडतोब गौतम गंभीर व गृहखात्याने या ट्विटची दखल घेत त्या प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला.

या मुलीच्या तक्रारीमुळे भारतीय क्रीडा प्राधिकारणात अनेक मुलींना त्यांच्या प्रशिक्षकांकडूनच लैंगिक छळाला सामोरे जात असल्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले. पण अशी अनेक प्रकरणे अजूनही चौकशी व अन्य चक्रात अडकली असून माहिती अधिकाराला दिलेल्या उत्तरानुसार भारतीय क्रीडा प्राधिकरणाने त्यांच्याकडे गेल्या दशकभरात ४५ तक्रारी आल्या व त्यातील २९ तक्रारी प्रशिक्षकांविरोधात असल्याचे इंडियन एक्स्प्रेसला सांगितले आहे.

गेल्या वर्षी संसदेच्या महिला सबलीकरण समितीने आपल्या अहवालात महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण वा छळ होत असल्याच्या अनेक घटना असू शकतात पण त्या उघडकीस येत नाहीत किंवा प्रशिक्षकांचा दबाव असल्याने त्यांच्याविरोधात काहीच कारवाई केली जात नाही किंवा तक्रारींचे अहवाल दडपले जातात असे निरीक्षण नोंदवले होते. आरोप असलेल्या काही प्रशिक्षकांना निलंबित न करता त्यांची बदली करणे किंवा त्यांच्या मानधनात कपात करणे वा पेन्शन रोखणे एवढीच कारवाई केली जाते असेही या अहवालात म्हटले होते.

२०१३मध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या गांधीनगर येथील केंद्रात दोन मुलींनी त्यांच्या प्रशिक्षकाविरोधात तक्रार केली होती. या प्रशिक्षकाने या मुलींचा लैंगिक छळ केला, त्यांचे व्हिडिओ काढले व त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली होती. या संदर्भात त्या मुलींनी तत्कालिन क्रीडामंत्री जितेंद्र सिंग व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पत्र पाठवले होते.

या पत्रात या मुलींनी प्रशिक्षक आपला लैंगिक छळ कशापद्धतीने करत होते याची अनेक उदाहरणे दिली होती. श्रीलंकेतील स्पर्धेत निवड होण्याचे कारण दाखवत या प्रशिक्षकाने आम्हाला त्याच्या कारमध्ये बोलावले व त्याला लैंगिक सुख दिले पाहिजे असा आग्रह धरला. ते न दिल्यास संपूर्ण कारकीर्द उध्वस्त करू अशी धमकीही दिल्याचे त्या मुलींचे म्हणणे होते.

या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर संबंधित प्रशिक्षकाची बदली सोनपत येथे डिसेंबर २०१३मध्ये करण्यात आली.

आणखी एक प्रकरण जानेवारी २०१४मध्ये उघडकीस आले होते. हिस्सारमधील पाच अल्पवयीन क्रीडापटू मुलींनी आपल्या प्रशिक्षकाविरोधात लैंगिक छळ केल्याची तक्रार प्रशासनाकडे केली. या प्रशिक्षकाने आज ‘वर्ल्ड किसिंग डे’ असल्याचे सांगत शरीर सुख मागितल्याचा आरोप या मुलींचा होता. या प्रकरणाची तक्रार झाली, पण गाव पंचायतीच्या मध्यस्थीने या तक्रारी मागे घेण्यात आल्या. तीन वर्षांनी या प्रशिक्षकाला शिक्षा म्हणून त्याच्या पेन्शनमध्ये १० टक्के रक्कम कपात करण्यात आली.

यासारखेच एक प्रकरण तिरुवनंतपुरम येथील लक्ष्मीबाई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन या संस्थेत घडले. पण तेथे प्रशिक्षकांविरोधात काहीच कारवाई करण्यात आली नाही.

भारतीय क्रीडा प्राधिकरणातील काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार महिला प्रशिक्षकांची संख्या अत्यंत कमी असणे व प्रशिक्षक आणि प्राधिकरणातील अधिकाऱ्यांमध्ये साटेलोटे असल्या कारणाने लैंगिक छळाच्या तक्रारींचा सोक्षमोक्ष लागत नाही.

जर एखाद्या प्रशिक्षकाला तक्रारीनुसार हटवले तर त्याची जागा घेणारा प्रशिक्षक लवकर मिळत नाही. त्यामुळे अशा प्रशिक्षकांची बदली करणे वा त्यांचे मानधन, पगार कापणे, पेन्शन थांबवणे असले पर्याय प्राधिकरणापुढे असतात.

या संदर्भात भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे माजी संचालक जिजी थॉमसन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पीडीत महिला खेळाडू अत्यंत दबावात असल्यामुळे त्या तक्रारी मागे घेतात, किंवा आपल्या जबाबात बदल करतात. त्यामुळे अनेक प्रकरणांची तड लागू शकत नाही, असे सांगितले.

बहुसंख्य मुली या साध्या घरातून आलेल्या असतात त्यांच्यावर अनेक पातळीवर दबाव आणला जातो असे थॉमसन यांचे म्हणणे आहे.

देशभरात भारतीय क्रीडा प्राधिकरणाची नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, औरंगाबाद, दमण व दीव, पतियाळा, एलुरू, काशीपूर, कटक, कोझीकोड, भोपाळ व मायीलधुथूराई येथे प्रशिक्षण केंद्रे आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0