सत्ताधाऱ्यांनी आत्मपरीक्षण करणे अत्यावश्यक: सरन्यायाधीश

सत्ताधाऱ्यांनी आत्मपरीक्षण करणे अत्यावश्यक: सरन्यायाधीश

पुट्टपर्थी: आपण केलेले निर्णय योग्य आहेत की नाही हे सत्ताधाऱ्यांनी दररोज तपासून पाहिले पाहिजे तसेच आपल्यात काही वाईट स्वभावधर्म येऊ नाहीत याचीही त्यां

गोवा समान नागरी कायद्याचे सरन्यायाधीशांकडून कौतुक
न्यायालयांच्या वार्षिक सुट्ट्या
चौकशी समितीत नसायला हवं होतः गोगोई

पुट्टपर्थी: आपण केलेले निर्णय योग्य आहेत की नाही हे सत्ताधाऱ्यांनी दररोज तपासून पाहिले पाहिजे तसेच आपल्यात काही वाईट स्वभावधर्म येऊ नाहीत याचीही त्यांनी खात्री केली पाहिजे, असे मत भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी सोमवारी व्यक्त केले.

आंध्रप्रदेशातील अनंतपुरामु जिल्ह्यातील पुट्टपर्थी शहरातील सत्यसाई इन्स्टिट्यूट ऑफ हायर लर्निंगच्या ४०व्या पदवीदान सोहळ्यात सरन्यायाधीश बोलत होते. यासाठी त्यांनी रामायण आणि महाभारतातील उदाहरणे उद्धृत केली. नेत्याने कोणती १४ वाईट गुणवैशिष्ट्ये टाळावीत हे रामायण व महाभारतामध्ये सांगितलेले आहे, असे ते म्हणाले.

“लोकशाही राज्यपद्धतीतील सर्व सत्ताधाऱ्यांनी त्यांचे दैनंदिन कामकाज सुरू करण्यापूर्वी आपल्यात काही वाईट स्वभावधर्म नाहीत, याची खात्री करून घ्यावी. सत्ताधाऱ्यांनी केवळ प्रशासन करण्याची गरज असते आणि ते प्रशासन लोकांच्या गरजेला अनुरूप असावे. आपल्याकडे अनेक शहाणे नेते आहेत आणि जगभरात व देशभरात काय घडामोडी चालल्या आहेत ते तुम्ही बघतच आहात,” असे सरन्यायाधीश म्हणाले.

लोकशाहीत जनताच सर्वोच्च स्थानी असते आणि जो काही निर्णय केला जाईल तो जनतेसाठी लाभदायी असला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

देशातील सर्व यंत्रणा स्वायत्त असाव्यात आणि त्यांनी प्रामाणिकपणे जनतेची सेवा करावी अशी आपली इच्छा आहे. हीच इच्छा सत्यसाईबाबाही व्यक्त करत असत, असेही सरन्यायाधीश म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0