६ तास युद्ध थांबवल्याची अफवा

६ तास युद्ध थांबवल्याची अफवा

नवी दिल्ली : युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरु असून, युक्रेनच्या विविध भागामध्ये अनेक भारतीय अडकले आहेत. मात्र या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी

मोदी सरकार देशाला घातकः काँग्रेसचा आरोप
आरक्षण आणि नरेंद्र मोदी: श्रीयुत दहा टक्के!
ग्रामीण मतदाराचा बदलता कौल

नवी दिल्ली : युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरु असून, युक्रेनच्या विविध भागामध्ये अनेक भारतीय अडकले आहेत. मात्र या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताने विनंती केल्यानुसार रशियाने ६ तास युद्ध थांबवल्याची अफवा सोशल मिडियावर पसरली असून, त्यामध्ये अनेक मान्यवर आणि पत्रकारही सामील झाले आहेत.

युक्रेनमधील भारतीय दूतावासाने सूचना जाहीर करून भारतीयांना खार्किव्ह सोडण्याचे आवाहन केले होते. मात्र त्याचवेळी भारतीयांना युक्रेन सोडत यावे, यासाठी भारत सरकारने विनंती केल्याने रशियाने ६ तास युद्ध थांबवणार असल्याचे मान्य केल्याची अफवा वृत्त म्हणून सोशल मिडियावर जोरदार चालवण्यात आले होते. त्यामध्ये अनेक मान्यवर आणि पत्रकारही सामील झाले. मात्र गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांना खार्किव्ह सोडण्यासाठी रशियाने युद्ध सहा तासांसाठी थांबवल्याच्या वृत्तालं दुजोरा दिला नाही.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. मात्र रशियाने असे युद्ध थांबवण्यास मान्यता दिल्याचे सर्वत्र पसरले होते.

गुरुवारी बोलताना बागची म्हणाले, “खार्किव्ह आणि सुमी येथून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी आम्ही युक्रेन आणि रशियाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. आमच्या सल्ल्यानंतरही काहीशे भारतीय अजूनही खार्किव्हमध्ये आहेत. आत्तापर्यंत एकूण १८,००० भारतीय नागरिकांनी युक्रेनची सीमा सोडली आहे.”

महाराष्ट्र भाजपचा प्रचार

भाजपा महाराष्ट्र या ट्विटर हँडलवरून ३ मार्चला एक ट्विट करण्यात आले. ‘हा नवीन भारत आहे! युक्रेनमधून भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी 6 तास रशियाने युद्ध थांबवलं. पंतप्रधान श्री. @narendramodiजी यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांच्याशी बोलल्यावर हे शक्य झालं. रशियन एअरफोर्स विमान व सैनिकी वाहनाने बाहेर काढण्याचं जाहीर केलं.’ अशा स्वरूपाचे ट्विट करण्यात आले.

‘भाजपा महाराष्ट्र’ने यासाठी ‘रशियन एम्बसी इन इंडिया’ या नावाने एक छायाचित्र वापरले आहे. मात्र रशियाच्या भारतातील राजदूत कार्यालयाचे नाव आणि ट्विटर हँडल ‘रशिया इन इंडिया’ या नावाने असून, त्या हँडलवर मात्र या स्वरूपाचे कोणतेही ट्विट दिसलेले नाही.

युक्रेन आणि रशियाची नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षित मार्ग देण्यावर चर्चा  

दरम्यान रशियाशी संवाद साधणारे युक्रेनचे प्रतिनिधी मंडळाच्या एका सदस्याने सांगितले, नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मार्ग तयार करण्यावर दोन्ही देशांची सहमती होत आहे.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर जेलेंस्की यांचे सल्लागार मिखाइलो पोडोलियाक यांनी सांगितले की नागरिकांना बाहेर पाडण्यासाठी जे मार्ग सुरक्षित केले जातील, तेथे युद्ध विराम लागू करण्यावर

रशियन राजदूत कार्यालयाचे हँडल

रशियन राजदूत कार्यालयाचे हँडल

रशिया आणि युक्रेन एका सहमतीवर पोहोचले आहेत.

मिखाइलो पोडोलियाक पोलॅंडच्या सीमेजवळ बेलारूसमध्ये चाललेल्या चर्चेत भाग घेतला होता. यानंतर चर्चेची तिसरी फेरी होणार आहे. या चर्चेमध्ये रशियाच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्त्व व्लादिमीर पुतिन यांचे सल्लागार व्लादिमीर मेदिन्स्की करीत आहेत.

रशियाचे खासदार लियोनिद स्लुत्स्की यांनी सांगितले, की चर्चेच्या पुढच्या फेरीमध्ये करार होऊ शकतात.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0