दिग्गज लेग स्पीनर शेन वॉर्नचे निधन

दिग्गज लेग स्पीनर शेन वॉर्नचे निधन

क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम लेगस्पीनर म्हणून ओळखला जाणारा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या निधन झाले. ते ५२ वर

चुरशीची व उत्कंठावर्धक स्पर्धा
भारत-पाक क्रिकेट- उन्माद निर्माण करण्यात काय अर्थ
बौद्धिक संपदा अधिकार म्हणजे काय? : भाग १

क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम लेगस्पीनर म्हणून ओळखला जाणारा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. शेन वॉर्न यांना त्यांच्या घरातच हृदयविकाराचा झटका आला, त्यांच्यावर लगेचच वैद्यकीय उपचार करण्यात आले होते पण त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शेन वॉर्न यांना क्रिकेट जगत वॉर्नी म्हणून ओळखत होते. गोलंदाजीत अद्भूत किमया असल्याने जगभरातील कोट्यवधी क्रिकेट रसिकांच्या मनात वॉर्न यांनी आपले स्थान निर्माण केले होते. व़ॉर्न यांच्यासारखा लेग स्पीनर गोलंदाज आजपर्यंत झाला नव्हता असेही क्रिकेट समीक्षकांचे मत होते. आपल्या १५ वर्षांच्या झळाळत्या व देदिप्यमान क्रिकेट कारकिर्दीत वॉर्न यांनी ७०८ बळी घेतले. क्रिकेटमध्ये सर्वोधिक बळी घेणाऱा श्रीलंकेचा गोलंदाज मुरलीधरन यांच्यानंतर व़ॉर्न यांचा क्रमांक होता. वॉर्न यांनी एकदिवसीय क्रिकेट सामन्यात २९३ बळी घेतले. ऑस्ट्रेलियाकडून ३००हून अधिक सामन्यात त्यांचे प्रतिनिधित्व होते.

वॉर्न यांची १९९२ मध्ये सिडनेत भारताविरुद्धच्या सामन्यापासून कारकीर्द सुरू झाली. त्यांना पहिला बळी मिळाला तो १५० धावांच्या बदल्यात. पण त्या नंतर एक झंझावाती कारकीर्द क्रिकेट जगताने पाहिली. १९९९मध्ये ऑस्ट्रेलियाने क्रिकेट विश्व चषक पटकावला तो वॉर्न यांच्या फिरकीने. त्यानंतर १९९३ ते २००३ दरम्यान झालेल्या ५ एशेस क्रिकेट लढतीत वॉर्ननी १९५ बळी घेतले होते. वॉर्न यांच्या फिरकीने इंग्लंडची प्रत्येकवेळी दाणादाण उडाली होती. इंग्लंडचा दिग्गज फलंदाज माइक गॅटिंग यांना त्रिफळाचीत करणारा लेग स्पीन हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम चेंडू म्हटला जातो. हा चेंडू टप्पा लेग स्टंपच्या खूप बाहेर पडला होता पण हा चेंडू वळून ऑफ स्टंपची बेल घेऊन गेला. हा चेंडू वॉर्न यांचा होता. या चेंडूची नोंद शतकातील सर्वोत्तम चेंडू अशी झाली. या चेंडूनंतर वॉर्न यांच्या खेळाला अमाप लोकप्रियता लाभत गेली.

२००६मध्ये एँशेस क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ५-० असा धुव्वा उडवला होता. त्यानंतर २००७मध्ये व़ॉर्न यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली.

पण कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर त्यांनी ट्वेन्टी-ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेत आपली चुणूक दाखवली. २००८मध्ये राजस्थान रॉयल्सना आयपीएल चषक मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

वॉर्न यांनी २०१३ रोजी संपूर्ण क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. त्यांनी पुढे क्रिकेट समालोचनही केले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0