पाश्चिमात्य देशच युद्धखोरः पुतीन यांचा आरोप

पाश्चिमात्य देशच युद्धखोरः पुतीन यांचा आरोप

रशियाच्या पूर्वेकडील व्लादिवस्तोक शहरात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये भाषण करताना पाश्चिमात्य राष्ट्रांच्या धोरणांव

सीपीएम नेत्या शैलजा टीचर यांनी मॅगसेसे पुरस्कार नाकारला
भोंगे वाजले की हनुमान चालिसा म्हणाः राज ठाकरेंचे आदेश
एन. डी. पाटील यांचे निधन

रशियाच्या पूर्वेकडील व्लादिवस्तोक शहरात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये भाषण करताना पाश्चिमात्य राष्ट्रांच्या धोरणांवर टीका केली. पाश्चिमात्य राष्ट्रांची दृष्टी अत्यंत संकुचित असून त्यांच्या हातातून जगावरची सत्ता जात असल्याने ते युद्धखोर पवित्रा घेत असल्याचा आरोप पुतीन यांनी केला.

पुतीन यांच्या भाषणातील काही मुद्दे खालील प्रमाणे

पाश्चिमात्य राष्ट्रांचे अधिपत्य कमी होत आहे

कोविड-१९ महासाथीनंतर पाश्चिमात्य राष्ट्रांच्या जगावरच्या अधिपत्याला घरघर लागली असून हे अधिपत्य प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्याकडून आर्थिक निर्बंधांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हे प्रयत्नच सध्याच्या जगात जे काही चालले आहे, त्याचे निदर्शक असल्याचे पुतीन म्हणाले.

बड्या देशांना धक्के

पाश्चिमात्य राष्ट्रांना त्यांच्या हिताची जागतिक रचना हवी असून त्यासाठी ते नियम बनवत असतात. स्वतःच्या फायद्यासाठी नियमांमध्ये मोडतोड करत असतात. या देशांना आता धक्के बसत असल्याने त्यांच्याकडून संकुचित धोरणे राबवली जात आहेत, त्यामुळे जागतिक सुरक्षा, राजकारण व अर्थकारण यावर परिणाम होत असल्याचे पुतीन म्हणाले.

पाश्चिमात्य देशातील नेत्यांचा त्यांच्याच देशातील जनतेशी संपर्क तुटलाय 

अमेरिका व त्यांच्या मित्र राष्ट्रांनी जे राजकारण सुरू केलेय ते जनताविरोधी असून त्यांचाच देशातील जनतेशी त्यांचा संपर्क तुटला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे युरोपीय संघातील देश रशियाशी आर्थिक, राजकीय संबंध तोडत आहेत. उद्योजक, व्यावसायिकांना रशियाच्या बाजारपेठेपासून, रशियाकडून मिळणाऱ्या ऊर्जेपासून वंचित करत आहेत. त्यामुळे हे उद्योजक स्पर्धात्मक जगात काम करू शकत नाहीत. जे देश रशियाच्या बाजारपेठेपासून दूर जात आहेत, त्याचा फायदा अमेरिका घेत आहे. आपल्या फायद्यासाठी अमेरिका कोणत्याही मर्यादा ठेवत नाही असे पुतीन म्हणाले.

गरीब देशांची पाश्चिमात्य देशांकडून फसवणूक

जगाचे अर्थकारण संकटात आल्याने त्याचे गंभीर परिणाम गरीब देशांवर होत आहेत. गरीब देश आर्थिक समस्येतून बाहेर येऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत या देशांना मदत करण्याचा देखावा पाश्चिमात्य देश करत असून युक्रेनची रखडलेली धान्यनिर्यात हे ज्वलंत उदाहरण आहे. रशियाने युक्रेनच्या बंदरात अडकलेली जहाजे सोडवण्यासाठी त्यांच्याशी करार केला. त्यासाठी तुर्की व संयुक्त राष्ट्रे यांच्याशी जुलैमध्ये चर्चा केली. त्यानंतर युक्रेनची जहाजे गरीब देशांकडे न जाता युरोपिय संघाकडे गेली. युक्रेनमधून गेलेल्या ८७ जहाजांपैकी केवळ २ जहाजे गरीब देशांमध्ये पोहचली. गरीब देशांना केवळ ३ टक्के धान्य मिळाले, असा आरोप पुतीन यांनी केला.

आर्थिक निर्बंधातून रशिया सावरत आहे

युक्रेनच्या संकटानंतर रशियावर पाश्चिमात्य राष्ट्रांकडून आर्थिक निर्बंध घालण्यात आले. त्या निर्बंधामुळे रशियाच्या उद्योजकांचे नुकसान झाले, व्यापारावर परिणाम झाला. पण आता देशातील अर्थव्यवस्था स्थिर होत असून महागाई कमी होत आहे, देशातील बेरोजगारी अत्यंत कमी आल्याचा दावा पुतीन यांनी केला.

आशिया देशांना सहकार्य हवे आहे

आशिया-पॅसिफिक रिजन या संघटनेने पाश्चिमात्य देशांच्या आर्थिक निर्बंधांना झुगारले होते. या देशांनी उलट रशियाशी आर्थिक संबंध हवेत म्हणून प्रयत्न सुरू केले. रशिया अशा देशांच्या सहकार्याचा आभारी असून त्यामुळे आशिया बाजारपेठेतील स्पर्धात्मकता कायम राहल्याचा दावा पुतीन यांनी केला.

युक्रेन युद्ध रशियाने सुरू केले नाही

युक्रेनचे युद्ध रशियाने सुरू केलेले नसून आमच्यावर हे पाश्चिमात्य राष्ट्रांनी थोपवल्याचा दावा पुतीन यांनी केला. आम्हाला युक्रेनवर लष्करी कारवाई करायची नव्हती. युक्रेनमध्ये बंडखोर गटांनी कारवाया सुरू केल्या होत्या. तसे आक्रमण २०१४ रोजीच झाले होते. रशियाने ८ वर्षानंतर लष्करी कारवाई केली, असेही पुतीन म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: