प्रसिद्ध फॅशन आणि ज्वेलरी डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांच्या मंगळसूत्राच्या जाहिरातीमध्ये एक मंगळसूत्र घातलेली स्त्री, एका पुरुषासोबत दाखविण्यात आली होती. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सब्यसाची यांना त्यांच्या मंगळसूत्रासह नव्या ज्युलरी कलेक्शनची जाहिरात मागे घेण्यासाठी २४ तासांचा अल्टीमेटम दिला यापूर्वी गृहमंत्र्यांनी डाबरच्या 'फेम ब्लीच' या उत्पादनाच्या करवाचौथच्या जाहिरातीवर आक्षेप घेतला होता, त्यानंतर कंपनीने ही जाहिरात मागे घेतली होती.
डाबरच्या करवा चौथच्या जाहिरातीला लक्ष्य करण्यात आल्यानंतर, मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी रविवारी प्रसिद्ध फॅशन आणि ज्वेलरी डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांच्या मंगळसूत्रासह नव्या ज्युलरी कलेक्शनची जाहिरात मागे घेण्यासाठी २४ तासांचा अल्टीमेटम दिला होता. ज्वेलरीची जाहिरात अश्लील आणि आक्षेपार्ह असल्याचे त्यांचे म्हणणे होते.
त्यानंतर लगेचच ही जाहिरात मागे घेण्यात आली.
कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की, वारसा आणि संस्कृती यासंदर्भात चर्चेच्या पार्श्वभूमीवर, मंगळसूत्राच्या जाहिरात मोहिमेचा उद्देश सर्वसमावेशकता आणि सशक्तीकरण यावर बोलणे हा होता. या मोहिमेचा उद्देश उत्सव साजरा करणे हा होता. यामुळे आमच्या समाजातील एक घटक दुखावला गेल्याने आम्हाला खूप दुःख होत आहे म्हणून आम्ही ही मोहीम मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या आठवड्यात, डाबर इंडिया प्रा. लि. ने फेम क्रीम ब्लीचची जाहिरात मागे घेतली. या जाहिरातीत एक समलिंगी जोडपं करवा चौथ साजरे करत आणि एकमेकांकडे चाळणीतून पाहताना दिसत होते. मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या जाहिरातीवर आक्षेप घेतला होता. ही जाहिरात आक्षेपार्ह असल्याचे सांगत त्यांनी कंपनीवर या जाहिरातीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.
सब्यसाची मुखर्जी यांची मंगळसूत्राची जाहिरात खूप आक्षेपार्ह आहे. मंगळसूत्र हा पवित्र दागिना आहे. मंगळसूत्राचे सोनेरी मणी देवी पार्वतीचं रुप आहे, असं आम्ही मानतो. काळे मणी भगवान शंकराचं रुप आहे. जे स्त्रीचं आणि तिच्या पतीचं रक्षण करतात. पार्वतीच्या आशीर्वादानं वैवाहिक जीवन सुखी होतं, असे मिश्रा म्हणाले होते.
COMMENTS