मुंबईः मनसुख हिरेन हत्या प्रकरण व अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटकेत असलेले एक आरोपी व माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना माफीचा साक्षीदार होण्यास विशेष स
मुंबईः मनसुख हिरेन हत्या प्रकरण व अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटकेत असलेले एक आरोपी व माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना माफीचा साक्षीदार होण्यास विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी मंजुरी दिली. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मागितलेल्या १०० कोटी रु.च्या खंडणी प्रकरणात आपणाला माफीचा साक्षीदार करावे असा अर्ज सचिन वाझे यांनी विशेष सीबीआय न्यायालयाकडे केला होता. या अर्जात वाझे यांनी आपण सीबीआयला चौकशीत सहकार्य केले होते व तसेच गुन्हे दंड संहितेतील तरतुदींनुसार त्यांनी मॅजिस्ट्रेटपुढे आपला जबाबही नोंदवला होता. त्यानंतर सीबीआयने काही अटी पुढे ठेवत वाझेंचा अर्ज स्वीकारला होता.
बुधवारी सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश डी. पी. शिंगडे यांनी वाझेंचा माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज मंजूर केला. आता हा अर्ज मंजूर केल्यामुळे सचिन वाझे सीबीआयच्या बाजूने आपला जबाब न्यायालयात देऊ शकतात.
COMMENTS