जया जेटलींच्या ४ वर्षाच्या तुरुंगवासाला स्थगिती

जया जेटलींच्या ४ वर्षाच्या तुरुंगवासाला स्थगिती

नवी दिल्लीः संरक्षण खात्याच्या दलालीप्रकरणात समता पार्टीच्या माजी अध्यक्ष जया जेटली यांना सुनावलेल्या ४ वर्षांच्या तुरुंगवास शिक्षेला दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली आहे. २०००-२००१मधील हे प्रकरण असून दिल्लीतील स्थानिक न्यायालयाने २१ जुलैला जेटली यांच्यासोबत समता पार्टीचे सदस्य गोपाल पचेरवाल व निवृत्त मेजर जनरल एस. पी. मुर्गी या दोघांनाही ४ वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला जेटली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. जानेवारी २००१मध्ये तहलका या मासिकाने ऑपरेशन वेस्ट एंड हे एक स्टिंग ऑपरेशन करून संरक्षण खात्यातील दलाली उघडकीस आली होती.

तहलका या मासिकाने वेस्ट एंड नावाची एक बनावट कंपनी स्थापन करून तत्कालिन भाजप सरकारचे स्टिंग ऑपरेशन केले होते. या स्टिंग ऑपरेशनमध्ये वेस्ट एंड कंपनीचा एक प्रतिनिधी मॅथ्यू सॅम्युएल यांच्याकडून जेटली यांनी लष्करासाठी आवश्यक असणार्या थर्मल इमेजर्सच्या खरेदीच्या बदल्यात दलाली म्हणून २ लाख रु. तर मुर्गी यांनी २० हजार रु. स्वीकारले होते. न्यायालयाने पुरावे पाहून जेटली व त्यांच्या अन्य दोन सहकार्यांनी दलाली स्वीकारल्याचे मान्य करत या तिघांना तुरुंगवास ठोठावला होता.

मूळ बातमी

COMMENTS