संवत २०७७: विक्रमी मोबदला आणि बरेच काही

संवत २०७७: विक्रमी मोबदला आणि बरेच काही

२०२१ हे साल भारताच्या स्मृतीत कोविडची भीषण दुसरी लाट आणणारे वर्ष म्हणून कोरले गेले असले, तरी शेअर बाजार या वर्षाकडे निराळ्या चष्म्यातून बघेल. सेन्सेक्

ज्ञानवापी मशीद प्रकरण जिल्हा न्यायाधिशांपुढे चालणार
प्रज्ञा सिंह ठाकूर संरक्षण सल्लागार समितीवर
‘मुस्कटदाबी करणे हा देशद्रोह कायद्याचा गैरवापर’

२०२१ हे साल भारताच्या स्मृतीत कोविडची भीषण दुसरी लाट आणणारे वर्ष म्हणून कोरले गेले असले, तरी शेअर बाजार या वर्षाकडे निराळ्या चष्म्यातून बघेल. सेन्सेक्स आणि निफ्टी या वर्षांत नवीन उंचीवर पोहोचले, प्राथमिक बाजारांमध्ये आजपर्यंत कधी नव्हता एवढा ओघ दिसला आणि स्थानिक व जागतिक अशा सर्वच स्तरांवर सर्व तिमाहींमध्ये रोखतेमध्ये वाढ झाली. हिंदू कॅलेंडर संवत २०७७ मध्ये अनेक उच्च बिंदू आले.

उत्तेजनपर उपाय आणि रोखता वाढवणाऱ्या धोरणांमुळे भारतीय बाजारांनी, संवत २०७७मध्ये, १३ वर्षांतील सर्वोच्च लाभ प्राप्त केले. केवळ बेंचमार्क निफ्टीनेच ४० टक्क्यांहून अधिक मोबदला मिळवून दिला नाही, तर मिड-कॅप्स व स्मॉल-कॅप्सनीही उत्तम कामगिरी करत अनुक्रमे ७० टक्के व ८० टक्के मोबदला दिला. शेअर बाजाराच्या भाषेत याला संधीचा लाभ उचलणे म्हटले जाते. संवत २०७७ मध्ये काही घटक खरोखर वेगळे होते.

मालाचे दर आणि त्यांच्या महागाई व कॉर्पोरेट उत्पन्नांवरील परिणाम

कंपन्यांची शेअर बाजार परिसंस्थेतील उत्पन्ने वाढलीही आहेत पण कमोडिटी दर वाढल्यामुळे त्यांच्या नफ्यावर परिणामही झाला आहे. कामगिरीतील फरकही बराच आहे. बजाज ऑटो व हिरो यांसारख्या टू-व्हीलर उत्पादकांच्या विक्रीला फटका बसला आहे, तर कार्सची मागणी व विक्री वाढत आहे. पुढील काळात हे अधिकच जाणवणार आहे.

जागतिक मध्यवर्ती बँकांचा धोरणात्मक पवित्रा

अमेरिकेतील फेडरल बँकेने नुकत्याच झालेल्या ओपन मार्केट कमिटीच्या बैठकीनंतर खरेदीचे आकारमान मासिक १५ अब्ज डॉलर्सने कमी केल्याची घोषणा केली. या बातमीकडे बाजारांमध्ये आत्मविश्वासाचे लक्षण म्हणून बघितले जात आहे. मात्र, दरांमध्ये खरोखर वाढ होईल तेव्हा फेडरल बँकेचे काम कठीण होऊ शकते. २००८ सालापासून जागतिक बाजार अतिस्वस्त तसेच मुबलक रोखतेच्या जोरावर पोसले गेले आहेत. २०१८ मध्ये दरांमध्ये खरोखर वाढ झाल्यानंतर अमेरिकेतील शेअर बाजार १३ टक्क्यांनी घसरले होते. भारतीय बाजारांमध्येही अशीच लक्षणे दिसून आली आहेत.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) नोव्हेंबरमध्ये ५,४७६ कोटी रुपयांची विक्री केली आहे.

आयपीओ पाइपलाइन आणि उच्च रिटेल व्याज

संवत २०७७ मध्ये विक्रमी प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) आले. दर, मूल्यांकने आणि लिस्टिंग्ज यांनी तर्क व वास्तव यांना अनेकदा खोटे पाडले आहे आणि या जारीकरणांमध्ये तुफान सबस्क्रिप्शन व उत्तम लिस्टिंग लाभ असे दोन्ही दिसून आले आहे. हे अव्याहत सुरूच राहणार आहे. मात्र, या धड्याची वारंवार पुनरावृत्ती करण्याची क्षमता बाजार व इतिहास दोहोंमध्ये आहे. बाजारामध्ये तुफान तेजी येते, मग ते खालीही येतात. छोट्या रकमा घेऊन आयपीओशी खेळणाऱ्या तरुण पिढीला याचा मोठा चटका बसू नये, एवढीच माझी इच्छा आहे.  जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यातील कच्चे दुवे, कोविड-१९च्या नवीन लाटेचा धोका हे मुद्दे अर्थातच आहेत पण  असे धक्के बाजारांनी यापूर्वीही पचवले आहेतच.

निवडीला असलेला वाव मर्यादितच आहे. संवत २०७७ मध्ये, सोन्याच्या किमती सुमारे ६ टक्क्यांनी घसरल्या. त्यापूर्वीच्या दोन वर्षांमध्ये त्या अनुक्रमे २६ टक्क्यांनी व २३ टक्क्यांनी वाढल्या होत्या. रिअल इस्टेटचे दर पुन्हा वाढत आहेत पण ही वाढ निवडक ठिकाणी होत आहे. निवासी घरांच्या किमतींमध्ये वाढ होत आहे, व्यापारी जागांच्या क्षेत्रात अजून संघर्ष सुरू आहे. रिटेल गुंतवणूकदारांची रूपरेखा (अधिक तरुण व अधिक जोखीम पत्करणारी) बघता, इक्विटी बाजाराला जर कशाची स्पर्धा असेल, तर ती जोमाने वाढणाऱ्या क्रिप्टो विश्वाची असेल. या असेटची वैधता हा वादा मुद्दा असू शकतो पण सरकारने आता ही व्यापारयोग्य कमोडिटी करण्यासाठी मार्ग आखून देण्याची वेळ आलेली आहे.

नवीन संवतात गोष्टी कशा असतील? चढउतारांसाठी तयार राहणे आणि काळानुसार अंदाज घेणे हे तर महत्त्वाचे मुद्दे असतीलच, पण माझ्या मते, दरांतील हालचालींच्या किल्ल्या मुबलक आर्थिक संसाधनांमध्येच राहतील. परदेशी ओघांमध्ये तीव्र स्वरूपाचे बदल झाल्यास आपले बाजार अस्थिर होतील आणि ही हानी पूर्णपणे भरून काढणे देशांतर्गत पैशाच्या जोरावर कठीण जाईल.

आयपीओ बाजारांत काही वेगळे वळण आले तरी बाजाराच्या उत्साहावर त्याचा परिणाम होईल. कारण, अनेक गुंतवणूकदारांची भिस्त त्यावर आहे. त्यामुळे स्टॉक्स आणि ट्रेड्स चातुर्याने निवडणे महत्त्वाचे आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0