सत्यपाल सिंह यांचे डार्विनला पुन्हा आव्हान

सत्यपाल सिंह यांचे डार्विनला पुन्हा आव्हान

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बागमत लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार सत्यपाल सिंह यांनी पुन्हा डार्विनच्या सिद्धांताला आव्हान दिले आहे. आम्ही माकडांच

महाविकास आघाडीचे फसलेले फ्लोअर मॅनेजमेंट
रजनीकांत ते गांगुली व्हाया पश्चिम बंगाल
अमित मालवीय बंगालचे सहप्रभारी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बागमत लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार सत्यपाल सिंह यांनी पुन्हा डार्विनच्या सिद्धांताला आव्हान दिले आहे. आम्ही माकडांचे वंशज नसून ऋषींचे संतान असल्याचे विधान त्यांनी लोकसभेत शुक्रवारी केले. लोकसभेत मानवाधिकार संरक्षण विधेयकावर चर्चा होती. त्या चर्चेत त्यांनी असे विधान केले.

आपली संस्कृती आपण ऋषींचे संतान असल्याचे मानते पण काही लोक आपण माकडांचे वंशज असल्याचा दावा करतात. अशा लोकांच्या भावनांना मला दुखवायचे नाही, असेही सिंह म्हणाले.

दरम्यान सत्यपाल सिंह यांच्या या विधानामुळे लोकसभेत विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांनी सत्यपाल सिंह यांच्या विधानाची खिल्ली उडवताना म्हटले की, दुर्दैवाने माझे पूर्वज ऋषी नव्हते तर ते विज्ञान सांगते त्याप्रमाणे होमो सेपियन्स होते. माझे आई-वडील शूद्र आहेत व ते कोणा परमेश्वराच्या पोटी जन्माला आले नव्हते. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी सत्यपाल सिंह यांचे हे विधान डार्विनच्या सिद्धांताच्या विपरीत असल्याचे म्हटले.

सत्यपाल सिंह यांचे डार्विनच्या सिद्धांताला आव्हान देण्याचा हा तिसरा प्रसंग आहे. सिंह यांची रसायनशास्त्रात पीएचडी असून काही महिन्यांपूर्वी डार्विनच्या सिद्धांताला आव्हान देताना माणसाचे पू्र्वज माकड नव्हते असे विधान केले होते. माझ्या या विधानाची सत्यता १०-१२ वर्षानंतर जगाला कळून चुकेल असाही दावा त्यांनी केला होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0