कोण म्हणते टक्का दिला?  सर्व आयआयटी मधील अनुसूचित जाती-जमातीतील प्राध्यापकांची संख्या तीन टक्क्यांपेक्षाही  कमी

कोण म्हणते टक्का दिला? सर्व आयआयटी मधील अनुसूचित जाती-जमातीतील प्राध्यापकांची संख्या तीन टक्क्यांपेक्षाही  कमी

तब्बल २३ आयआयटी संस्थांमधील ६,०४३ प्राध्यापकांपैकी केवळ १४९ अनुसूचीत जाती व २१ जमातीतील आहेत.

‘आयआयटी ड्रीम’चा पुनर्विचार करण्याची गरज
अवैज्ञानिक उद्योगात ‘आयआयटी’ही!
आयआयटी मद्रासमध्ये १०० विद्यार्थ्यांना कोरोना

नवी दिल्ली: देशभरातील भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (आय.आय.टी) ३% पेक्षादेखील  कमी प्राध्यापक आरक्षित वर्गातील आहेत असे केंद्र सरकारने नमूद केले आहे. २३ आयआयटीमध्ये ६,०४३ प्राध्यापकांपैकी, १४९ अनुसूचित जाती आणि २१ अनुसूचित जमातींमधील आहेत असे  मानव संसाधन विकास मंत्रालयाने लोकसभेमध्ये  सांगितले आहे. याचा अर्थ केवळ  २.८% प्राध्यापक आरक्षित श्रेणीतून येतात.

केंद्रीय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही  माहिती लोकसभेत विचारल्या गेलेल्या एका प्रश्नाचे उत्तर म्हणून दिली. या संदर्भातील प्रश्न भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि एससी/एसटी संस्थांच्या  अखिल भारतीय संघटनेचे (All India Confederation of SC/ST Organizations) अध्यक्ष, उदित राज यांनी विचारला होता.

लोकसभेत बोलताना जावडेकर म्हणाले की, “आयआयटी मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांच्या बाबतीत शिक्षकांच्या नियुक्तीमध्ये आरक्षण हे प्राथमिक स्तरातील जागांसाठीच आहे, ज्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि व्याख्याते यांचा समावेश होतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानाव्यतिरिक्त बाकीचे विषय म्हणजेच मानव्य शास्त्र,  समाज विज्ञान आणि  व्यवस्थापन शास्त्रामधील शिक्षकांच्या जागांसाठी तसेच शिक्षकेतर जागांसाठी आरक्षण हे नियमाप्रमाणे लागू आहे. तिथे अनुसूचित जातींना १५%, अनुसूचित जमातींना ७.५% आणि इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) २७% आरक्षण आहे.

जावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आयआयटी धनबाद’ येथे अनुसूचित जाती व जमातीतून येणाऱ्या प्राध्यापकांची संख्या ३५, म्हणजेच सगळ्यात जास्त आहे. तसेच ‘आयआयटी मंडी’ येथे या आरक्षित श्रेणींतून  येणारा एकही प्राध्यापक नाही असेही त्यांनी नमूद केले.

आयआयटी मधील मागासवर्गीय प्राध्यापकांची संख्या:

आयआयटी अनुसूचित जाती (एससी) अनुसूचित जमाती (एसटी)
खरगपूर
बॉम्बे
मद्रास १३
दिल्ली १०
कानपूर
रुरकी १०
गुवाहाटी १६
बी. एच. यू १९
जोधपूर
रोपार
इंदौर
पटना
गांधीनगर
हैदराबाद
भुवनेश्वर
मंडी
धनबाद २९
जम्मू
तिरुपती
पल्लकड
धारवाड
गोवा
भिलई
एकूण १४९ २१

आयआयटी मधल्या सर्वसमावेशकतेबद्दलची चर्चा जरी फार होत नसली, तरीदेखील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील अशाच परिस्थितीबाबत तेथील माजी विद्यार्थी आणि अभ्यासक गेले अनेक दिवस बोलत आहेत. दीपक मलघन आणि सिद्धार्थ जोशी या अभ्यासकांच्या म्हणण्याप्रमाणे, “आयआयएम मधील ५१२ प्राध्यापकांबद्दलची माहिती त्यांनी गोळा केली. त्यामध्ये केवळ २ अनुसूचित जातीतील होते. अनुसूचित जमातीतून येणारा एकही प्राध्यापक यामध्ये आढळून आला नाही.” समावेशकतेमधल्या या त्रुटीचा मागोवा घेताना तेव्हा त्यांना आढळले की ही त्रुटी आयआयएममधील पदव्युत्तर कार्यक्रमातच आहे – बहुतांश प्राध्यापकांनी पदव्युत्तर शिक्षण आयआयएममधूनच घेतले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0