फी वाढीविरोधात आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांचे उपोषण सुरूच

फी वाढीविरोधात आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांचे उपोषण सुरूच

विद्यार्थ्यांच्या मते, आयआयटी बॉम्बे प्रशासनाने विद्यमान पदव्युत्तर आणि पीएचडी विद्यार्थ्यांसाठी ७, ४५० रुपये, नवीन प्रवेश घेणाऱ्या पदवीधरांसाठी ३२,४५० रुपये आणि पीएचडी विद्यार्थ्यांसाठी ९,९५० रुपयांची वाढ केली आहे.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ : परिसरातील आदिवासींची निदर्शने
२०१९-२० जीडीपी ५ टक्केच, १० वर्षातला नीचांक
ट्रंप-बायडन चर्चा, धड करमणूकही नाही, ज्ञानही नाही

पुणे : आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) बॉम्बेतील विद्यार्थ्यांचे फी वाढीवरून ६ ऑगस्टपासून उपोषण सुरू आहे. आंदोलनाचे आयोजन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटाने आपण लवकर हार मानणार नसल्याचे म्हटले आहे.

फी वाढीबाबत संपावर असलेल्या विद्यार्थ्यांच्या ट्विटर अकाउंटवर (@iitbfeehike) गुरुवारी सांगण्यात आले की, ‘आयआयटी बॉम्बे प्रशासनाची उदासीनता सुरूच आहे आणि आम्ही फी वाढीविरोधात आमचा संघर्ष सुरू ठेवत आहोत. सहाव्या दिवशीही उपोषण सुरूच आहे.”

द क्विंटने दिलेल्या वृत्तानुसार, आंदोलक विद्यार्थ्यांनी या काळात शिक्षणाच्या खाजगीकरणाबाबत जागरूकता पसरवण्यासाठी व्याख्याने आणि चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

देशातील या महत्वाच्या इन्स्टिट्यूटने अलीकडेच ३५ टक्के फी वाढ जाहीर केली होती, ज्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएट (पीजी) विद्यार्थी संतप्त झाले होते. ‘न्यूज 18’च्या वृत्तानुसार, जुलैच्या सुरुवातीला हे आंदोलन सुरू झाले, जेव्हा आयआयटी बॉम्बे प्रशासनाने त्यांच्या सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सुमारे ३५ टक्के फी वाढ प्रस्तावित केली.

आंदोलक विद्यार्थ्यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, प्रशासकीय मंडळाने मंजूर केलेल्या ठरावात वार्षिक ५ टक्के शुल्कवाढीची शिफारस केली होती, ज्याच्या आधावर ही खास फी वाढ लागू करण्यात आली आहे.

‘मिंट’मधील एका अहवालानुसार, २०२० मध्ये फी वाढ प्रथम मंजूर करण्यात आली होती, कोविड-19 साथीच्या आजारामुळे संस्थेचे उपक्रम ठप्प झाल्याने ती थांबवण्यात आली होती. त्यानंतर २०२२ मध्ये हा मुद्दा पुन्हा समोर आला, जेव्हा अधिकाऱ्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये ३५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला.

एवढेच नाही तर संस्थेने वसतिगृहाची फीही २ हजार रुपयांवरून २,७०० रुपये केली आहे. ही दरवाढ विद्यार्थ्यांसाठी विवेक शून्य असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.

‘मिंट’च्या मते, आयआयटी बॉम्बेने पीएचडी विद्यार्थ्यांसाठी ट्यूशन फी २,५०० रुपयांवरून ५, ००० रुपये केली आहे. याशिवाय एमटेकची ट्यूशन फी प्रति सेमिस्टर ५, ००० रुपयांवरून ३०, ००० रुपये प्रति सेमिस्टर करण्यात आली आहे.

याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शुल्कवाढ समितीमध्ये विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश करण्याची मागणीही केली आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रमांचे विद्यार्थी संपात सामील आहेत, जरी पदवीपूर्व (पदव्युत्तर) अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचा त्यात समावेश नाही, मात्र फी वाढ त्यांनाही लागू आहे.

एका विद्यार्थ्याने सांगितले की, सध्याच्या पदव्युत्तर आणि पीएचडी विद्यार्थ्यांच्या फी रचनेत शिक्षण शुल्काव्यतिरिक्त इतर घटकांमध्ये वाढ झाली आहे. नवीन प्रवेशांसाठी शिक्षण शुल्कात प्रचंड वाढ झाल्याने ही वाढ लक्षणीय आहे.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यमान पदव्युत्तर आणि पीएचडी विद्यार्थ्यांसाठी, ७, ४५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नवीन प्रवेश घेणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ३२, ४५० रुपये पीएचडी विद्यार्थ्यांसाठी ९,९५० रुपयांची वाढ झाली आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0