तानसेन महोत्सवातून अखिलेश गुंदेचांचे नाव वगळले

तानसेन महोत्सवातून अखिलेश गुंदेचांचे नाव वगळले

भोपाळः युरोपमधील एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केलेले ध्रुपद संस्थानातील प्रसिद्ध पखावज वादक अखिलेश गुंदेचा यांचे नाव ग्वाल्हेर येथे होणार्या तानसेन श

प्रिया रामाणी, सीता आणि अहिल्या
पोलिसांचा निष्कर्ष मान्य नाही – तनुश्री दत्ता
अब्रूनुकसानीच्या खटल्यातून प्रिया रामानी निर्दोष मुक्त

भोपाळः युरोपमधील एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केलेले ध्रुपद संस्थानातील प्रसिद्ध पखावज वादक अखिलेश गुंदेचा यांचे नाव ग्वाल्हेर येथे होणार्या तानसेन शास्त्रीय संगीत महोत्सवातून हटवण्यात आले आहे.

गेल्या ऑक्टोबरमध्ये ध्रुपद गायकीतील अन्य एक प्रसिद्ध कलाकार रमाकांत गुंदेचा व अखिलेश गुंदेचा यांनी आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप युरोपमधील एका महिलेने केला होता. या महिलेच्या वतीने अमस्टरडॅमस्थित तिच्या योगशिक्षिकेने फेसबुकवरील ‘ध्रुपद फॅमिली युरोप’ या ग्रुपमध्ये हा आरोप केला होता. पीडित महिलेला आपले नाव उघड करायचे नसल्याने तिच्यावतीने आपण ही पोस्ट केली असल्याचे या योगशिक्षिकेचे म्हणणे होते.

या पीडित महिलेच्या आरोपानंतर ध्रुपद संस्थानाने अंतर्गत समिती नेमून घटनेची चौकशी सुरू केली होती. त्यावेळी अखिलेख गुंदेचा यांनी स्वतःहून संस्थेच्या कामकाजापासून दूर राहण्याच्या निर्णय घेतला होता तर रमाकांत गुंदेचा यांचे गेल्याच वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर त्यांचा भाऊ उमाकांत हे ध्रुपद संस्था पाहात आहेत. रमाकांत यांचे तिसरे बंधू म्हणून अखिलेश अध्यापनाचे काम करत आहेत.

ग्वाल्हेरमधल्या तानसेन महोत्सवाचे आयोजन उस्ताद अल्लाउद्दीन खान कला व संगीत अकादमी व मध्य प्रदेश सांस्कृतिक विभागाकडून केले जाते. या महोत्सवात अन्य एक कलाकार मधु भट्ट यांचा अखिलेश गुंदेचा यांच्यासोबतचा कार्यक्रम होता. पण अखिलेश यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाल्याने मधु भट्ट यांनी अखिलेश यांच्यासोबत कार्यक्रम करण्यास नकार दिला. त्याचबरोबर प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक टी.एम. कृष्णा यांनीही गुंदेचा तानसेन महोत्सवात भाग घेत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत म. प्रदेश सरकार या संदर्भात का खुलासा करत नाही, असा प्रश्न सोशल मीडियातून उपस्थित केला होता.

पण गुंदेचा यांचे नाव हटवण्याबाबत म. प्रदेश संस्कृती विभागाने व तानसेन महोत्सव व्यवस्थापनाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

नेमके प्रकरण काय होते?

रमाकांत गुंदेचा व अखिलेश गुंदेचा हे भोपाळमधील प्रसिद्ध ध्रुपद संस्था चालवतात. या संस्थेला युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा समितीने अधिकृत दर्जा दिल्याने युरोपमधील अनेक विद्यार्थी या संस्थेत शिकण्यासाठी येत असतात.

गेल्या ऑक्टोबरमध्ये रमाकांत गुंदेचा व अखिलेश गुंदेचा यांनी आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप युरोपमधील एका महिलेने फेसबुकवर केला होता. फेसबुकवरील पोस्टमध्ये असे म्हटले होते की, रमाकांत व अखिलेश यांनी अनेक महिला शिष्यांवर लैंगिक छळ केले असून या शिष्यांना धमक्या मिळत असल्याने त्यांनी मौन बागळले आहे. खुद्ध रमाकांत व अखिलेश या दोघांनीही याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही, याकडेही या पोस्टमध्ये लक्ष वेधण्यात आले होते. संगीतात चांगले करिअर करायचे असेल तर काही तडजोड करावी लागेल, असे हे दोघे शिक्षक महिला विद्यार्थ्यांना सांगत असत व शिकवताना सतत महिलांच्या शरीराला स्पर्श करत असत, असा आरोप या पोस्टमध्ये करण्यात आला होता.

या पोस्टमध्ये भारतातील विद्यार्थ्यांसंदर्भातही काळजी व्यक्त करण्यात आली होती. ध्रुपद संस्थानमध्ये खेड्यापाड्यातील मुले शिकण्यासाठी येत असतात, त्यांना संगीतात करिअर करायचे असते म्हणून ते अशा अत्याचाराला बळी पडत आहेत. गुंदेचा बंधु हे अत्यंत प्रभावशाली असल्याने त्यांच्या शब्दाशिवाय संगीत कार्यक्रम मिळत नाहीत वा अशा कार्यक्रमात आपली कला सादर करता येत नाही, असेही या पोस्टमध्ये म्हटले होते.

ध्रुपद संस्थानचा खुलासा

लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर ध्रुपद संस्थानचे संचालक उमाकांत गुंदेचा यांनी एक पत्रक जारी करत या आरोपांची संस्थेची एक समिती चौकशी करेल. आणि या समितीचा अंतिम अहवाल येईपर्यंत या संस्थेच्या कोणत्याही कामकाजापासून अखिलेश यांना दूर ठेवण्यात येईल, असे स्पष्ट केले होते.

तर दुसरीकडे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंतांनी उमाकांत गुंदेचा यांनी आपला पदभार सोडावा अशी मागणी केली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0