‘माविम’च्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

‘माविम’च्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

मुंबई: राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखालील महिला आर्थिक विकास महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा

राज्यात एकाच दिवशी ५ लाख लोकांना लस
बीडमध्ये एकाच रुग्णवाहिकेत २२ शवांना स्मशानात नेले
पॉझिटीव्हीटी दर व ऑक्सिजन बेड उपलब्धतेवर निर्बंधांचा निर्णय

मुंबई: राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखालील महिला आर्थिक विकास महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती, महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना १ जुलै २०२१पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यात येईल. १ जुलै २०२१ ते सुधारित वेतनश्रेणीची अंमलबजावणी करेपर्यंतच्या कालावधीतील थकबाकी एकरकमी किंवा टप्प्याटप्प्याने अदा करणे याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे महामंडळास राहील.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचना मंजूर करण्यात आलेली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महामंडळातील कर्मचाऱ्यांना देखील सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी  महामंडळातील कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहितीही ॲड. ठाकूर यांनी दिली.

या संबंधीचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: