बंडखोर गटाचे नाव ‘शिवसेना (बाळासाहेब)’

बंडखोर गटाचे नाव ‘शिवसेना (बाळासाहेब)’

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव काढून दाखवा, असे आव्हान दिल्यानंतर शिवसेनेतून फुटून निघालेल्या एकनाथ शिंदे गटाने आपले ‘शिवसेना (बाळासाहेब)’ असे नाव घेतल्याचे वृत्त आहे.

आसाम येथे गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे गटाचे आमदार उपस्थित आहे. त्यांनी आपल्या गटाचे नाव ‘शिवसेना बाळासाहेब’, असे घेतल्याचे वृत्त आहे. एकनाथ शिंदे गटामध्ये सामील झालेले आमदार दीपक केसरकर यांनी वाहिन्यांशी बोलताना, आपल्या गटाचे नाव ‘शिवसेना बाळासाहेब’ असे करण्यात आल्याचे सांगितले.

एकनाथ शिंदे गटाने आपले ‘शिवसेना (बाळासाहेब)’ असे नाव घेतल्याचे, एकनाथ शिंदे गटातर्फे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले. आम्ही अजूनही पक्षात असून, आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही शिवसेनेचेच सदस्य आहोत, असे एकनाथ शिंदे गटातर्फे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी ऑनलाईन पत्रकारपरिषदेत सांगितले. केसरकर म्हणाले, आमचा राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसला पाठींबा नाही, असे केसरकर यांनी सांगितले. पक्षांतरबंदी कायदा आम्हाला लागू होत नाही. आम्ही दुसऱ्या पक्षात गेलेलो नाही. आमच्याकडे बहुमत आहे. आम्ही शिवसेना हायजॅक केलेली नाही. शिवसेना कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने हायजॅक केली होती, असे केसरकर म्हणाले. आमदारांच्या घरांवर जे हल्ले होत आहेत, त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी भेदभाव न करण्याची शपथ घेतली होती, त्याचे पालन करावे. महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे, ती बदलली, की आम्ही महाराष्ट्रात परत येऊ.

दरम्यान शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मुंबईत दादर येथील शिवसेना भवनात बैठक झाली. यामध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे आणि नेतेपदावरून एकनाथ शिंदे, रामदास कदम यांना काढून टाकण्याचे ठराव करण्यात आले. मराठी अस्मितेशी कधीच प्रतारणा करणार नाही, असे ठराव करण्यात आले. या बैठकीला शिवसेनेचे खंदार, पदाधिकारी, नेते, उपनेते आणि आमदार उपस्थित होते. उद्धव ठाकरे हे या बैठकीला उपस्थित होते.

राज्यात ठिकठिकाणी शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांच्या विरोधात आंदोलने सुरू झाली आहे. खारघर, पनवेल, पुणे, कोल्हापूर, धुळे, मुंबई येथे निदर्शने करण्यात आले. पुण्यात तानाजी सावंत, उल्हास नगर येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयावर, मुंबईत आमदार सदा सरवणकर यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ले केले.

दरम्यान विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांना मान्यटा दिली. शिवसेनेकडून फुटीर १६ आमदारांची आमदारकी रद्द करण्यासाठी हालचाल सुरू केली आहे.

दरम्यान मुंबईमध्ये १० जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे.

COMMENTS