शोपियन एनकाउंटरमध्ये आमची चुकीः लष्कराची कबुली

शोपियन एनकाउंटरमध्ये आमची चुकीः लष्कराची कबुली

श्रीनगरः गेल्या १८ जुलै रोजी काश्मीर खोर्यात शोपियन जिल्ह्यात भारतीय लष्करांकडून तीन मजुरांना दहशतवादी समजून झालेल्या एनकाउंटर प्रकरणात लष्कराने आपल्य

शोपियन एन्काउंटरः मुलाचे शव द्या; वडिलांची मागणी
सोहराबुद्दीन: आरोपीने खुनाची कबुली दिली, तरी न्याय नाहीच
एन्काउंटर, झुंडशाहीच्या ‘न्याया’ला ५० टक्के पोलिसांचे समर्थन

श्रीनगरः गेल्या १८ जुलै रोजी काश्मीर खोर्यात शोपियन जिल्ह्यात भारतीय लष्करांकडून तीन मजुरांना दहशतवादी समजून झालेल्या एनकाउंटर प्रकरणात लष्कराने आपल्याला जवानांना दोषी मानले आहे. हे एनकाउंटर एफ्स्पा १९९०च्या कायद्याचे उल्लंघन असून आपल्या जवानांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे लष्कराने म्हटले आहे. या प्रकरणातील जवानांवर लष्करी कायद्यानुसार अनुशासनात्मक कारवाई सुरू केली जाईल, असेही लष्कराने शुक्रवारी सांगितले. एनकाउंटरमध्ये मारण्यात आलेले तिघेजण राजौरीतील रहिवासी होते, अशीही कबुली लष्कराने दिली आहे.

भारतीय लष्कर आपल्या कारवाईत नैतिकदृष्ट्या प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करत असते व कायद्यानुसार या प्रकरणातील प्रत्येक घडामोड पुढे ठेवली जाईल, असे लष्कराच्या पत्रकात म्हटले आहे.

आपल्या स्पष्टीकरणात लष्कराने एफ्स्पा-१९९० या कायद्याचे व मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन आपल्या जवानांनी कसे केले याचे दीर्घ उत्तर दिलेले नाही पण प्राथमिक स्तरावर दोषी जवानांवर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.

ऑपरेशन अमशीपोरा एनकाउंटरमध्ये ठार मारण्यात आलेले तीन अज्ञात दहशतवाद्यांची नावे इम्तियाज अहमद, अब्रार अहमद व मोहम्मद इब्रार अशी असून हे तिघे राजौरी येथील रहिवासी होते, असे लष्कराच्या पत्रकात म्हटले आहे. यातील अब्रार अहमद हा अल्पवयीन होता.

१८ जुलैला सकाळी भारतीय लष्कराने शोपियन येथील अमशीपोरा येथे तीन दहशतवाद्यांचे एनकाउंटर केल्याचा दावा केला होता. पण काही दिवसांनंतर एनकाउंटर झालेले दहशतवादी नसून ते मजूर होते व तेथे राजौरीतून शोपियन येथे मजुरीसाठी गेले होते, असा दावा मृतांच्या कुटुंबियांनी केला होता.

हेही वाचा शोपियन एन्काउंटरमधील मजूर गरीब : ग्रामस्थांचा दावा

त्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिस व भारतीय लष्कराने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू केली होती.

शोपियनमध्ये दहशतवाद्यांचे एनकाउंटर झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले पण  त्यावेळी या दहशतवाद्यांची ओळख पटली नव्हती. नंतर या तिघांची जी छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत, त्यावरून हे दहशतवादी नसून मजूर आहेत आणि ते आमच्या कुटुंबातले महिन्याभरापासून बेपत्ता झालेले तीन सदस्य असल्याचा आरोप राजौरीतील मोहम्मद युसूफ यांच्या कुटुंबाने केला होता.

त्यानंतर १३ ऑगस्टला शोपियन पोलिसांनी युसूफ यांच्या घरी राजौरीत जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे डीएनए नमुने घेतले होते.

शुक्रवारी लष्कराने डीएनए अहवालाची वाट पाहात असल्याचे सांगितले. त्याचबरोबर हे तिघे जण दहशतवादी वा अन्य कृत्यात सहभागी होते की नाही याबाबत पोलिस चौकशी सुरू असल्याचे लष्कराने सांगितले.

एसपीओवर संशयाची सुई

या एकूण प्रकरणाबाबत द वायरला सूत्रांनी सांगितले की, शोपियन एन्काउंटरमध्ये तीन पोलिसांचा समावेश असून त्यात एक विशेष पोलिस अधिकारी आहे. या अधिकार्याची चौकशी सुरू असून हा अधिकारी पूँछ येथील असून त्याची खोर्यात बदली करण्यात आली होती. दुसरी व्यक्ती पुलवामा येथील तर तिसरी व्यक्ती शोपियन येथील आहे. पण या संदर्भात द. काश्मीरमधील पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

मृतांच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवला

शुक्रवारी भारतीय लष्कराने आपली चूक कबुल केली आणि योगायोगाने शुक्रवारीच मोहम्मद युसूफ व त्यांच्या कुटुंबियांचा जबाब लष्कराच्या अवंतीपोरा येथील व्हिक्टर फोर्स कार्यालयात नोंदवण्यात आला. हे वृत्त समजताच लष्कराने दिलेले स्पष्टीकरण आमच्याच दाव्याला पुष्टी दिल्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया युसूफ यांनी दिली. शोपियन एन्काउंटरमध्ये मारण्यात आलेले दहशतवादी नव्हते तर आमच्या घरातल्या व्यक्ती होत्या. त्या मजुरीसाठी शोपियन येथे गेल्या होत्या. असे आम्ही सतत सांगत होतो पण आमच्या म्हणण्याकडे पहिले दुर्लक्षिले गेले, असे युसूफ यांनी सांगितले.

आता युसूफ यांच्या कुटुंबियांनी आपल्या मृत नातेवाईकांचे पुरलेले शव लष्कराने द्यावेत, ते आम्ही आमच्या गावी दफन करू, अशी विनंती केली आहे.

मूळ प्रकरण काय होते?

१८ जुलैला झालेले हे एन्काउंटर राष्ट्रीय रायफल्सच्या ६२ व्या बटालियनकडून झाले होते. या बटालियनला आमशीपोरा येथे काही दहशतवादी असल्याची खबर मिळाली त्यानुसार तेथे ऑपरेशन केले गेले. या ऑपरेशनमध्ये पोलिस व सीआरपीएफही सामील होती. या ऑपरेशनमध्ये तिघांना ठार मारल्यानंतर त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे, दारुगोळा असे गुन्हेगारी स्वरुपाचे साहित्य आढळून आले. हे सर्व साहित्य जमा करून त्याचे रेकॉर्ड करण्यात आले आहे. तसेच तिघांच्या मृतदेहांचे डीएनए नमुने घेऊन अन्य वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेद्वारे माहिती घेऊन ते मृतदेह बारामुल्ला येथे अंत्यविधीसाठी पाठवण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0