पेटीएम काही तासांत पुन्हा प्ले स्टोअरवर

पेटीएम काही तासांत पुन्हा प्ले स्टोअरवर

नवी दिल्लीः जुगार व सट्टा खेळला जात असल्याच्या कारणाने गूगलने डिजिटल पेमेंट सेवा देणारे पेटीएम हे ऍप शुक्रवारी आपल्या गूगल प्ले स्टोअरवरून हटवले खरे प

पायल रोहतगी ९ दिवसांसाठी कोठडीत
बेनामी राजकीय देणगीदार
जिओमधील ७.७ टक्के हिस्सेदारी गूगलकडे

नवी दिल्लीः जुगार व सट्टा खेळला जात असल्याच्या कारणाने गूगलने डिजिटल पेमेंट सेवा देणारे पेटीएम हे ऍप शुक्रवारी आपल्या गूगल प्ले स्टोअरवरून हटवले खरे पण काही तासांतच ते प्ले स्टोअर पुन्हा आले.

पेटीएमने ट्विटरवर, आपण पुन्हा लाइव्ह आलो आहोत, अशी या संदर्भातील माहिती दिली.

पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी ट्विटरवर खुलासा केला की, आम्ही सकाळी यूपीआय कॅशबॅक कॅम्पेन आमच्या ऍपवर आणली होती. त्यावरून गूगलने आमचे ऍप प्ले स्टोअरवरून हटवले. भारतात ग्राहकांना पैसे परत देणे हा जुगार समजला जातो का, याचा निर्णय तुम्हीच घ्या, असा सवाल शर्मा यांनी केला.

नेमके घडले काय?

गूगले पेटीएम आपल्या प्ले स्टोअरवरून हटवले असले तरी पेटीएमचे अन्य पेटीएम फॉर बिझनेस, पेटीएम मॉल व पेटीएम मनी ऍप गूगल स्टोअरवर उपलब्ध होते. पेटीएमच्या ऍपवरून ऑनलाइन कॅसिनो व अन्य जुगार, सट्टा खेळला जातो. तो कंपनीच्या कायद्यांचा भंग असून आपली कंपनी अशा ऍपला परवानगी देत नाही, असे गूगलने स्पष्ट केले होते. गूगलने आपल्या ब्लॉगवर पेटीएम कंपनीचे थेट नाव घेतलेले नव्हते पण पेटीएमने आपले ऍप अँड्राइडवरून काही काळासाठी डाऊनलोड करता येणार नाही, असे ट्विट केले होते. त्यामुळे गोंधळ उडाला. त्यावर ग्राहकांचे पैसे सुरक्षित असून आमच्या ऍपचा वापर मात्र सुरूच राहील असे पेटीएमने स्पष्ट केले.

पेटीएमने आपल्या ऍपच्या माध्यमातून ग्राहकांना पैसे जिंकता यावेत म्हणून फँटसी क्रिकेट हे फीचर सुरू केले होते. याने गूगलच्या मार्गदर्शक तत्वाचा भंग होतो असे दिसून आले होते. त्यामुळे गूगलने ही कारवाई केली. आम्ही ऑनलाइन कॅसिनो, सट्टेबाजी करण्यास परवानगी देत नाही. हा बेकायदा प्रकार असून तो सट्टेबाजीला प्रोत्साहन देणारा आहे. आमच्या ग्राहकाचे कोणतेही आर्थिक नुकसान करण्याचा आमचा हेतू नाही, असे गूगलचे म्हणणे होते.

२०१०मध्ये भारतात पेटीएमची सुरूवात झाली होती व २०१६मध्ये देशात नोटबंदी जाहीर केल्यानंतर लोकांनी डिजिटल व्यवहार करावे असा एक प्रचार सुरू झाला. या प्रचाराचा कंपनीला अप्रत्यक्ष फायदा झाला होता.

महत्त्वाचे म्हणजे नोटबंदी जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर आभार मानणारी जाहिरात पेटीएमने सर्व वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0