सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत बंधनकारक

सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत बंधनकारक

मुंबई: महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, २०१७ यात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असून त्यामुळे म

जात प्रमाणपत्र, जातपडताळणीची प्रक्रिया एकत्रितपणे होणार
मनरेगात घसरला रोजगार; ७ वर्षातला निचांक
‘जग बदल, जाणुनी मार्क्स…’

मुंबई: महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, २०१७ यात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असून त्यामुळे मोठ्या दुकानाप्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील.

दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ हा अधिनियम लागू होत असून दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या व त्यावर उपाययोजना करण्याची मागणीही होत होती.

बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेढ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात. यापुढे रस्त्यालगतच्या सर्वच दुकानांवरील पाट्या मराठीत लावाव्या लागतील. मराठीत-देवनागरी लिपीतील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती मंजूर करण्यात आली आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी यासाठी मंत्रालयात संबंधितांची बैठक घेतली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0