४ सदस्यांची टीम सोनियांना साह्य करणार

४ सदस्यांची टीम सोनियांना साह्य करणार

नवी दिल्लीः काँग्रेस कार्यकारिणीच्या सोमवारच्या बैठकीत पक्षाच्या नेतृत्वावरून मोठा गदारोळ माजल्यानंतर पक्षातील मतभेद कमी करण्याच्या उद्देशाने चार सदस्

प्रशांत किशोर यांच्या काँग्रेसमधील भूमिकेवर पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार
काँग्रेसवरची टीका अज्ञान मुलक, अवास्तव व पूर्वग्रह दूषित
मध्यप्रदेश काँग्रेसद्वारे रामनवमी, हनुमानजयंती साजरी करण्याच्या सूचना

नवी दिल्लीः काँग्रेस कार्यकारिणीच्या सोमवारच्या बैठकीत पक्षाच्या नेतृत्वावरून मोठा गदारोळ माजल्यानंतर पक्षातील मतभेद कमी करण्याच्या उद्देशाने चार सदस्यांची एक टीम स्थापन करून ती हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना मदत करणार आहे. ही टीम काँग्रेसमधील नेतृत्व पेच सोडवणे, पक्ष संघटनात लक्ष घालणे व पक्षात रचनात्मक बदल करणे याबाबत सोनिया गांधी यांच्याशी सल्लामसलत करेल, अशी माहिती द वायरला मिळाली आहे.

या टीमच्या माध्यमातून पक्षात लोकशाही अधिक रुजवणे व गांधी कुटुंबाच्या हातात पक्षाची सर्वंकष सत्ता नाही, हा संदेश जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या टीमचा प्रमुख सोनिया गांधी यांना मदत करेल व तो पक्षाचा उपाध्यक्ष म्हणूनही काम करेल. वास्तविक काँग्रेस पक्षाच्या घटनेत उपाध्यक्ष पदाचा उल्लेख नसून तशी निवडही आजपर्यंत झाली नव्हती पण आता पक्षातील रचनात्मक बदल म्हणून तसे पद तयार केले जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेस अध्यक्षांना मदत करण्यासाठी एखादी साहाय्यकारी समिती नेमण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. २०१२मध्ये सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने काँग्रेस कार्यकारिणीने राज्यसभा खासदार अहमद पटेल, ए. के. अँटनी, जनार्दन द्विवेदी आदी सदस्यांची एक टीम स्थापन केली होती.

सोमवारी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेसची देशव्यापी सदस्य संख्या वाढवण्यासाठी मोहीम हाती घेण्याबाबतही चर्चा झाली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0