सरकारी खर्च कमी करण्याच्या काँग्रेसच्या सूचना

सरकारी खर्च कमी करण्याच्या काँग्रेसच्या सूचना

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग व त्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर केलेला हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आपल्या जाहिरातींवरचा खर्च, नव्या

मणिपूरमध्ये भाजपचे सरकार अल्पमतात
तेजस्वी सूर्यांकडून ‘हिंदू धर्म वापसी’चे आवाहन मागे
कर्नाटकात भाजपमुळे जेडीएसकडे विधान परिषद अध्यक्षपद

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग व त्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर केलेला हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आपल्या जाहिरातींवरचा खर्च, नव्या संसद भवनाचे निर्माण (सेंट्रल व्हिस्टा रिडेव्हलमेंट प्रोजेक्ट) कामाला स्थगिती द्यावी अशा सूचना काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला केल्या आहेत.

गेल्या आठवड्यात मोदी यांनी सर्वपक्षीयांशी कोरोना साथीसंदर्भात विचारविनिमय केला होता. त्यानंतर मंगळवारी सोनिया गांधींनी एक पत्र पाठवून सरकारला पाच सूचना केल्या. या सूचनेमुळे सरकारी पैशाची बचत होईल व तो पैसा संपूर्णपणे सध्याच्या आरोग्य व्यवस्थेवर केंद्रीत करता येईल असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

या संदर्भात मोदी यांनी लिहिलेल्या पत्रात सोनिया गांधी यांनी सरकारने आपल्या एकूण खर्चात (कर्मचार्यांचे पगार, पेन्शन व योजना व्यतिरिक्त) सुमारे ३० टक्क्याने कपात करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्यमंत्री व नोकरशहांचे सर्व परदेश दौरे स्थगित करण्यास सांगितले आहे.

पीएम केअर या फंडात आलेली सर्व मदत पंतप्रधान राष्ट्रीय आपतकालिन निधीमध्ये हस्तांतरीत करावी जेणेकरून सरकारची यातून आर्थिक निधीबाबतचा पारदर्शीपणा, कार्यक्षमता व जबाबदारी जनतेला दिसून येईल.

त्याचबरोबर पैशाचा विनियोग कोरोना ग्रस्तांना होण्यासाठी टीव्ही, वर्तमानपत्रे व ऑनलाइन माध्यमांवरच्या सरकारच्या सर्व जाहिराती दोन वर्षांसाठी बंद ठेवाव्यात असे या सूचनेत नमूद करण्यात आले आहे.

केंद्र सरकारकडून नवे संसद भवन बांधण्याच्या हालचाली सुरू आहेत. या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा खर्चच सुमारे २० हजार कोटी रु. असून हे काम लगेचच थांबवावे व सध्याच्या ऐतिहासिक संसद भवनात संसदेचे कामकाज सुरू राहील याची काळजी आपण सर्वच घेऊ शकतो, असे सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0