श्रीलंकेच्या अर्थमंत्र्यांचे दुबईला होणारे पलायन रोखले

श्रीलंकेच्या अर्थमंत्र्यांचे दुबईला होणारे पलायन रोखले

कोलंबोः संपूर्ण देशात अराजक माजलेले असताना श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे बंधू व माजी अर्थमंत्री बेसिल राजपक्षे हे देशाबाहेर दुबईला पळू

‘आंदोलनाचा अधिकार आहे पण रस्ते अडवू नका’
निर्भया बलात्कारप्रकरणातील ४ दोषींना २२ जानेवारीला फाशी
कोरोनाचे औषध नव्हे, केवळ बनवाबनवी!

कोलंबोः संपूर्ण देशात अराजक माजलेले असताना श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे बंधू व माजी अर्थमंत्री बेसिल राजपक्षे हे देशाबाहेर दुबईला पळून जात असताना विमानतळावर काही प्रवाशांनी त्यांना ओळखले, त्यानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी बेसिल राजपक्षे यांना देशाबाहेर जाण्यास परवानगी नाकारल्याचे वृत्त आहे.

बेसिल राजपक्षे मंगळवारी सकाळी कोलंबो आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हीआयपी टर्मिनलमधून दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते पण त्यावर अनेक प्रवाशांनी हरकत घेतल्याने त्यांना श्रीलंकेतच राहावे लागले.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास बेसिल राजपक्षे चेक इन काउंटरवर आले व तेथे सव्वा तीनपर्यंत होते. त्यांना दुबईला जाण्यास इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे बेसिल यांना विमानतळावरून बाहेर जावे लागले.

दरम्यान बेसिल राजपक्षे यांना भारताने शरणागती दिली असल्याचे वृत्त खोटे असल्याचे भारत सरकारने स्पष्ट केले आहे. गेले दोन दिवस श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे बुधवारी राजीनामा देऊन भारतात शरणागती पत्करणार असल्याचे वृत्त पसरले आहे. या संदर्भातील कोणताही अधिकृत खुलासा दोन्ही देशांकडून झालेला नाही.

गोटाबाया राजपक्षेंनाही देशाबाहेर जाण्यास मज्जाव केला

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था एएफपीने सांगितले की, गोटाबाया राजपक्षेंनीही देशाबाहेर पलायन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी अडवले व त्यांचा देशाबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न हाणून पाडला. राजपक्षे व त्यांची पत्नी कोलंबो विमानतळावर आल्या होत्या. विमानतळावर आल्यानंतर या दोघांच्या पासपोर्टवर शिक्का मारण्यास व या दोघांना व्हीआयपी सूट देण्यास उपस्थित अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे राजपक्षे दाम्पत्य अनेक वेळ विमानतळावर थांबले होते. त्यांच्या उपस्थितीत दुबईला चार विमानांनी उड्डाण केले, त्यानंतर या दोघांना विमानतळानजीक असलेल्या लष्कराच्या तळघरात नेण्यात आले. या दोघांना बाहेर पळून जाण्यास परवानगी दिली असती तर विमानतळावरील अधिकाऱ्यांमध्ये फूट पडली असती व तेथे अराजक सुरू झाले असते असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दोन दिवसांपूर्वीच संतप्त नागरिकांनी राष्ट्रपतींचे निवासस्थान ताब्यात घेतले होते. त्यानंतर शेकडो नागरिक राष्ट्रपतींच्या भव्य पॅलेसचा फेरफटका मारताना दिसले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0