शिवसेनेचा द्रौपदी मुर्मूंना पाठींबा

शिवसेनेचा द्रौपदी मुर्मूंना पाठींबा

मुंबई : शिवसेना राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देत असल्याचे आज शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे

‘धर्मनिरपेक्ष’ पक्ष किती ‘धर्मनिरपेक्ष’?
आरक्षण आणि नरेंद्र मोदी: श्रीयुत दहा टक्के!
महाराष्ट्र पोलिसांनी नुपूर शर्मा, नवीन जिंदालला समन्स बजावले

मुंबई : शिवसेना राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देत असल्याचे आज शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेना राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देत असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, “उलट सुलट बातम्या पसरवल्या जात आहेत. पण माझ्यावर कोणत्याही खासदारांनी दबाव टाकलेला नाही, काही संघटना आणि आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्याने आम्ही राजकारणापलिकडे जाऊन द्रौपदी मुर्मू  यांना पाठींबा देत आहोत.”

ठाकरे म्हणले, की यांपूर्वी शिवसेनेने प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना असा पाठींबा दिला होता. ते म्हणाले, “सध्याचे राजकारण पाहता आम्ही खरे तर असा पाठींबा देणे हे वेगळे वाटेल, पण द्रौपदी मुर्मू  या आदिवासी समाजातील महिला सर्वोच्च स्थानी जात असल्याने हा पाठींबा देत आहोत.”

शिवसेना भवनामध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते संजय राऊत आणि अनिल देसाई उपस्थित होते. राऊत म्हणाले, की शिवसेनेचे सरचिटणीस सुभाष देसाई यांनी काल सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आज राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना पत्र दिल्याचे राऊत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पदाची जी शपथ राज्यपालांनी दिली आहे, ती बेकायदेशीर   असल्याचे पत्रात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाची पुढील सुनावणी होईपर्यंत फारतर हे सरकार काळजीवाहू असेल, मात्र त्यांना कोणतेही कायदेशीर अधिकार देऊ नयेत. मंत्रीमंडळाचा शपथविधी घेऊ नये. कोणतेही लभाचे पद देऊ नये. कोणतेही घटना बाह्य कृत्य राजभवनातून होऊ नये, असे पत्रात म्हटले असल्याचे राऊत यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0