श्रीनगरः शहराच्या बाहेर पोलिसांच्या एका बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस ठार तर १२ पोलिस कर्मचारी जखमी झाले. हा हल्ला सोमवारी संध्याकाळी
श्रीनगरः शहराच्या बाहेर पोलिसांच्या एका बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस ठार तर १२ पोलिस कर्मचारी जखमी झाले. हा हल्ला सोमवारी संध्याकाळी झाला. मृतांमध्ये एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा व हवालदाराचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ९ व्या बटालियनच्या जवानांना घेऊन बस निघाली होती. श्रीनगरपासून १४ किमी अंतरावर पम्पोरा येथे बस आली असताना काही दहशतवाद्यांनी बसवर चोहोबाजूंनी गोळीबार केला. यात दोन पोलिस ठार तर १४ जखमी झाले. मृत पोलिसांची नावे गुलाम हसन व शफीक अली असून हसन हे सहाय्यक पोलिस निरीक्षक तर अली हे हवालदार पदावर कार्यरत होते.
या घटनेच्या एका व्हीडिओमध्ये हल्ला झाल्यानंतर काही नागरिक पोलिसांना मदत करताना दिसत होते. घटनास्थळी रुग्णवाहिका आणण्यासाठी नागरिक पोलिसांना मदत करत होते.
हा हल्ला नेमका किती दहशतवाद्यांनी केला याची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही. पण काही सूत्रांनुसार दोन पेक्षा अधिक दहशतवादी या हल्ल्यात सामील झाले असण्याची शक्यता आहे.
हा हल्ला झाल्यानंतर दहशतवादी पळून गेले.
हा हल्ला होण्याआधी १० तासांपूर्वी एका चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. ही चकमक रंगग्रेथ या ठिकाणी घडली. मृत दहशतवाद्याचे नाव अदिल असून तो पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन आले होता, असे पोलिसांनी सांगितले.
मूळ वृत्त
COMMENTS