मुंबई: सांस्कृतिक कार्य विभागामार्फत २०१९ आणि २०२० या वर्षासाठीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. राज्य सांस्कृतिक पुरस्कारातील म
मुंबई: सांस्कृतिक कार्य विभागामार्फत २०१९ आणि २०२० या वर्षासाठीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
राज्य सांस्कृतिक पुरस्कारातील मराठी नाटक कलाक्षेत्रासाठी २०१९ साठीचा पुरस्कार कुमार सोहोनी यांना तर २०२० साठीचा पुरस्कार गंगाराम गवाणकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
कंठसंगीतासाठी २०१९ साठीचा पुरस्कार पंडितकुमार सुरुशे यांना तर २०२० साठीचा पुरस्कार कल्याणजी गायकवाड यांना जाहीर करण्यात आला आहे. उपशास्त्रीय संगीतासाठी २०१९ साठीचा पुरस्कार शौनक अभिषेकी यांना तर २०२० साठीचा पुरस्कार देवकी पंडित यांना जाहीर करण्यात आला आहे.
मराठी चित्रपटासाठी २०१९ साठीचा पुरस्कार मधु कांबीकर यांना तर २०२० साठीचा पुरस्कार वसंत इंगळे यांना जाहीर करण्यात आला आहे.
कीर्तनासाठी २०१९ साठीचा पुरस्कार ज्ञानेश्वर वाबळे यांना तर २०२० साठीचा पुरस्कार गुरुबाबा औसेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
शाहिरीसाठी २०१९ साठीचा पुरस्कार अवधूत विभूते यांना तर २०२० साठीचा पुरस्कार कै. कृष्णकांत जाधव (मरणोत्तर) यांना जाहीर करण्यात आला आहे.
नृत्यासाठी २०१९ साठीचा पुरस्कार शुभदा वराडकर यांना तर २०२० साठीचा पुरस्कार जयश्री राजगोपालन यांना जाहीर करण्यात आला आहे.
कलादानासाठी २०१९ साठीचा पुरस्कार अन्वर कुरेशी यांना तर २०२० साठीचा पुरस्कार देवेंद्र दोडके यांना जाहीर करण्यात आला आहे.
वाद्यसंगीतासाठी २०१९ साठीचा पुरस्कार सुभाष खरोटे यांना तर २०२० साठीचा पुरस्कार ओंकार गुलवडी यांना जाहीर करण्यात आला आहे.
तमाशासाठी २०१९ साठीचा पुरस्कार शिवाजी थोरात यांना तर २०२० साठीचा पुरस्कार सुरेश काळे यांना जाहीर करण्यात आला आहे.
लोककलेसाठी २०१९ साठीचा पुरस्कार सरला नांदुलेकर यांना तर २०२० साठीचा पुरस्कार कमलाबाई शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे.
आदिवासी गिरीजनसाठी २०१९ साठीचा पुरस्कार मोहन मेश्राम यांना तर २०२० साठीचा पुरस्कार गणपत मसगे यांना जाहीर करण्यात आला आहे.
रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जाहीर
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षांसाठीचे नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार आणि संगीताचार्य कै.बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
२०२० – २१ साठीचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार सतीश आळेकर यांना तर २०२१-२२ साठीचा पुरस्कार दत्ता भगत यांना जाहीर करण्यात आला आहे.
२०२० – २१ साठीचा संगीताचार्य कै.बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार दिप्ती भोगले यांना तर २०२१-२२ साठीचा पुरस्कार सुधीर ठाकूर यांना जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप ५ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.
COMMENTS