‘राफेल’च्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

‘राफेल’च्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

नवी दिल्ली : रफाल लढाऊ विमान खरेदी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका गुरुवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई या

राफेल घोटाळाः दलालीसाठी बनावट बिले; सीबीआयचे दुर्लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी १५ प्रश्न (त्यांनी कधी उत्तर द्यायचे ठरवलेच तर!)
‘रफाल’ आणि राजनय

नवी दिल्ली : रफाल लढाऊ विमान खरेदी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका गुरुवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या तीन सदस्यीय पीठाने एकमताने फेटाळल्या. या याचिकांमध्ये काहीच तथ्य नाही असे न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले.

३६ रफाल लढाऊ विमानांच्या खरेदीत मोदी सरकारकडून गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी केल्यानंतर हे प्रकरण गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचले होते. नंतर डिसेंबर २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रफाल विमान खरेदीच्या प्रक्रियेत न्यायालय लक्ष घालू शकत नाही हा अधिकार सरकारचा असल्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर या निर्णयावर फेरविचार करावा म्हणून माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, पत्रकार अरुण शौरी व वकील प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. सरकारने सर्वोच्च न्यायालयाला अपुरी व चुकीची माहिती दिली होती त्यामुळे या न्यायालयाने स्वत:च्या निर्णयाचा फेरविचार करावा असे या याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.

त्यावर उत्तर देताना सरन्यायाधीशांनी आम्ही या कराराच्या निर्णयप्रक्रियेतील सर्व व्यवहार तपासले असून भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्यांशी चर्चाही केली आहे. यातून आम्हाला या व्यवहारात काहीच शंका घ्यावी असे वाटत नसल्याचे मत व्यक्त केले.  त्यामुळे या याचिकांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने या याचिका फेटाळल्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0