सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर बुधवारी संध्याकाळी नवी दिल्ली येथील लोधी रोड स्मशानभूमीत संपूर्ण शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण

आमार कोलकाता – भाग ५ : बंगालमधले नवजागरण
बौद्ध की महार वाद : स्वाभिमान हवा की सवलती ?
काँग्रेस नेते शरद रणपिसे यांचे निधन

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर बुधवारी संध्याकाळी नवी दिल्ली येथील लोधी रोड स्मशानभूमीत संपूर्ण शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्काराच्या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि अनेक नेते उपस्थित होते.

भारतीय राष्ट्रध्वजामध्ये ठेवलेले स्वराज यांचे पार्थिव, भाजप मुख्यालयात ठेवण्यात आले होते. तेथून ते लोधी रोड स्मशानभूमीत आणण्यात आले.

भाजप मुख्यालयामध्ये सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ.

भाजप मुख्यालयामध्ये सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ.

सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्या ६७ वर्षांच्या होत्या. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने, रात्री १० वाजून २० मिनिटांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना रुग्णालयात आणण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

भाजपच्या महत्त्वाच्या महिला नेत्या असणाऱ्या स्वराज, तब्येतीच्या कारणामुळे या निवडणुकीपासून लांब राहिल्या होत्या. १६ व्या लोकसभेमध्ये मध्यप्रदेशातील विदिशा मतदार संघातून निवडून आलेल्या स्वराज यांच्यावर मुत्रपिंडाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती.

लोकसभेवर ७ वेळा निवडून गेलेल्या सुषमा स्वराज यांनी अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्येही अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. हरियाणा मंत्रीमंडळात त्या सर्वांत तरुण मंत्री होत्या. १९९८ मध्ये त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0