न्यायाधीशाची हत्याः २४३ जण ताब्यात, २५० रिक्षा जप्त

न्यायाधीशाची हत्याः २४३ जण ताब्यात, २५० रिक्षा जप्त

धनबादः झारखंडमधील धनबाद शहरात गेल्या बुधवारी सकाळी सत्र न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या संशयास्पद हत्या प्रकरणात पोलिसांनी रविवारी २४३ जणांना ताब्यात घेत

लॉर्डस् कसोटी: भारताचा “न भूतो न भविष्यति” विजय….
अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्राच्या वाट्याला नेमकं काय?
नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेपुढे बळी पडलेला पक्ष

धनबादः झारखंडमधील धनबाद शहरात गेल्या बुधवारी सकाळी सत्र न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या संशयास्पद हत्या प्रकरणात पोलिसांनी रविवारी २४३ जणांना ताब्यात घेतले तर १७ जणांना अटक केली. याच बरोबर पोलिसांनी २५० ऑटो रिक्षाही जप्त केल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणात उशीरा फिर्याद दाखल केली म्हणून एका पोलिस कर्मचार्याला तर अन्य एका पोलिसाने या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक केले म्हणून त्यालाही निलंबित केले आहे.

ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती. बुधवारी सकाळी फिरण्यास गेलेल्या उत्तम आनंद यांना एका तीन चाकी ऑटोरिक्षाने मागून धडक मारली. या धडकेत ते मरण पावले होते. या घटनेने देशभर खळबळ माजली होती. रविवारी झारखंड सरकारने या प्रकरणाची सीबीआयकडे चौकशी जाहीर केली होती.

या घटनेनंतर पोलिसांनी धनबाद जिल्ह्यातील ५३ हॉटेलांची चौकशी केली. तसेच विविध पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्या आहेत. ज्या रिक्षांची कागदपत्रे अपूर्ण आहेत अशा २५० रिक्षा जप्त केल्या.

या घटनेचे चित्रण सीसीटीव्हीत झाल्याने पोलिसांनी ऑटोरिक्षा चालकासह अन्य दोघांना ताब्यात घेतले होते. त्याचबरोबर रिक्षाही ताब्यात घेतली होती. या आहे. न्यायाधीशांचा हा मृत्यू संशयास्पद असल्याने विशेष पोलिस पथक स्थापन करण्यात आले.

ज्या ऑटो रिक्षाच्या चालकाने ही धडक मारली तो चालक लखन कुमार वर्मा धनबादमधील सुनार पट्टी येथे राहणारा असून दुसरा आरोप राहुल वर्मा स्थानिक रहिवासी आहे. लखन कुमार वर्माने आपणच रिक्षा चालवत होतो असे पोलिसांना सांगितले. लखनला गिरीडीह येथून ताब्यात घेण्यात आले होते तर राहुलला धनबाद रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार उत्तम आनंद यांच्या न्यायालयात माफियांशी संबंधित काही प्रकरणाची सुनावणी सुरू होती. त्यांनी काही दिवसांपूर्वी दोन गुंडाचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यातून त्यांची हत्या झाल्याचा संशय आहे.

तर द क्विंटनुसार उत्तम आनंद यांच्यापुढे रंजय हत्याकांड प्रकरणाचाही सुनावणी सुरू होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: