कमल हसनचा पक्ष १५४ जागा लढवणार

कमल हसनचा पक्ष १५४ जागा लढवणार

चेन्नईः प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक-निर्माते व अभिनेते कमल हसन यांचा मक्कल निधी मैयाम (एमएनएम) पक्ष तामिळनाडूत होत असलेल्या विधानसभा निवडणुकांत आपले १५

यंदाही मोदी सरकारकडून आंबेडकर पुरस्कारांची घोषणा नाही
ब्लू स्टार कारवाईला ३८ वर्षे पूर्ण; सुवर्णमंदिरात खलिस्तानचे नारे
किमया खेळपट्टीची की फिरकी गोलंदाजांची?

चेन्नईः प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक-निर्माते व अभिनेते कमल हसन यांचा मक्कल निधी मैयाम (एमएनएम) पक्ष तामिळनाडूत होत असलेल्या विधानसभा निवडणुकांत आपले १५४ उमेदवार उभे करणार आहेत. एमएनएमने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अभिनेते व नेते सरत कुमार यांच्या ‘ऑल इंडिया समथुआ मख्खल कटची’ (एआयएसएमके) व ‘इंडिया जननायका कटची’ (आयजेके) या पक्षांसोबत जागावाटपही जाहीर केले आहे. एआयएसएमके व आयजेके हे दोन पक्ष ४० जागा लढवणार आहेत.

२०१८मध्ये कमल हसन यांनी एमएनएम पक्ष स्थापन केला. आपल्या पक्षाची राजकीय विचारधारा मध्यममार्गी असेल असे त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांत या पक्षाने ४ कोटी १८ लाख, २५ हजार ६६९ मतांपैकी १५ लाख ७५ हजार ६४० मते ( ३.७७ टक्के) मते मिळवली होती.

आयजेके या पक्षाची स्थापना ७९ वर्षांचे टी. आर. पारीवेंनधार यांनी केली आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत पारीवेंनधार यांनी द्रमुकच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती व ते पेराम्बलूर येथून निवडून आले होते.

या अगोदर २०१४च्या लोकसभा निवडणुकांत आयजेके हा भाजपचा सहयोगी पक्ष होता.

एआयएएमकेचे प्रमुख सरथ कुमार हे २००१-०६ या दरम्यान द्रमुकचे राज्यसभा सदस्य होते. नंतर त्यांना अण्णा द्रमुकमध्ये प्रवेश घेतला व आता त्यांनी या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला.

अण्णा द्रमुक-भाजप आघाडीतून डीएमडीके बाहेर

आपल्या पक्षाला योग्य जागा मिळात नसल्याचे कारण दाखवत अण्णाद्रमुक व भाजप आघाडीतील डीएमडीके पक्षाने स्वतंत्र निवडणुका लढवणार असल्याची मंगळवारी घोषणा केली.

तामिळ सिनस्टार विजयकांत हे डीएमडीके पक्षाचे प्रमुख असून त्यांची अण्णा द्रमुक व भाजपसोबत जागावाटपाबाबत तीन वेळा बैठका झाल्या आहेत. या बैठकांतून जागा वाटपाबाबत सहमती झाली नसल्याने आघाडीतून बाहेर पडत असल्याचे विजयकांत यांनी सांगितले. सध्याचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांचा पराभव निश्चित असून त्यांचे डिपॉझिटही जप्त होईल, अशी प्रतिक्रिया विजयकांत यांनी दिली.

२०१६च्या विधानसभा निवडणुकांत डीएमडीकेने डावे व दलित पक्षांशी हात मिळवत तिसर्या आघाडीची घोषणा केली होती. यामुळे मतविभाजन होऊन त्याचा फायदा अण्णाद्रमुकला झाला व ते सत्तेवर आले होते. त्यानंतर २०१९मध्ये डीएमडीकेने अण्णा द्रमुक व भाजप आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला होता व निवडणुका लढल्या होत्या

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0