कोविड काळातील अर्थव्यवस्थेच्या नुकसानीची भरपाई एक दशकानंतर

कोविड काळातील अर्थव्यवस्थेच्या नुकसानीची भरपाई एक दशकानंतर

नवी दिल्लीः कोविड-१९ महासाथ व लॉकडाऊन यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान भरून येण्यासाठी एक दशकाहून म्हणजे २०३४-३५ सालापर्यंत काळ लागेल असा

पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे पूर्ण शैक्षणिक शुल्क माफ
अर्थसंकल्प २०२२-२३: आरोग्यक्षेत्राला वाटाण्याच्या अक्षता!
५ राज्यात लसीकरण गती वाढवा; निवडणूक आयोगाचे निर्देश

नवी दिल्लीः कोविड-१९ महासाथ व लॉकडाऊन यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान भरून येण्यासाठी एक दशकाहून म्हणजे २०३४-३५ सालापर्यंत काळ लागेल असा अंदाज रिझर्व्ह बँकेने एका अहवालात वर्तवला आहे. या अहवालात कोविडमुळे अर्थव्यवस्थेच्या झालेल्या नुकसानीचा आकडा ५२ लाख कोटी रु. इतका वर्तवला आहे.

कोविड-१९ची लाट अनेक टप्प्यात आल्याने अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ शकली नाही, त्याने नुकसान प्रचंड झाले. मार्च-जून २०२० मध्ये पहिली लाट आली होती. त्यानंतर अर्थव्यवस्था सुरळीत होत असतानाच एप्रिल-जून २१ रोजी दुसरी महाभयंकर लाट आली, त्यानंतर जानेवारी २०२२मध्येही तिसरी लाट आली, त्याने अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर येऊ शकली नाही असे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सध्या रशिया-युक्रेन युद्धाचेही संकट उभे राहिले आहे. त्यातून इंधनवाढ, महागाई अशी दोन संकटे अर्थव्यवस्थेपुढे आली. हेही अर्थव्यवस्थेपुढील आव्हान असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार २०२१ या वित्तीय वर्षांत अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान १७.१ लाख कोटी रु. असून २०२२ सालचे १७.१ लाख कोटी रु. व २०२२ सालचे १६.४ लाख कोटी रु. नुकसान झाले आहे.

हा अहवाल रिझर्व्ह बँकेतील इकॉनॉमी व पॉलिसी रिसर्च खात्याने तयार केला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0