ट्रोल झाल्याने तनिष्कची जाहिरात मागे

ट्रोल झाल्याने तनिष्कची जाहिरात मागे

नवी दिल्लीः हिंदू-मुस्लिम विवाह संबंधांतील तनिष्क या ज्वेलरी ब्रँडच्या एका जाहिरातीवर सोशल मीडियातून ट्रोलिंग झाल्याने ती मागे घेण्याचा निर्णय टायटन स

इंदिरा गांधी पुण्यतिथीची जाहिरात नसल्याने काँग्रेसवर टीका
तीन वर्षांत केंद्र सरकारचा जाहिरातीवर ९११ कोटींचा खर्च
गंगेच्या शुद्धीकरणाच्या जाहिरातींवर कोट्यावधी लुटले

नवी दिल्लीः हिंदू-मुस्लिम विवाह संबंधांतील तनिष्क या ज्वेलरी ब्रँडच्या एका जाहिरातीवर सोशल मीडियातून ट्रोलिंग झाल्याने ती मागे घेण्याचा निर्णय टायटन समुहाने घेतला आहे.

या जाहिरातीमध्ये एक मुस्लिम कुटुंब आपल्या घरात आलेल्या हिंदू सुनेच्या डोहाळे कार्यक्रमाची जोरदार तयारी करत असल्याचे दाखवले आहे. हे मुस्लिम कुटुंब आपल्या सुनेला आपलीच मुलगी मानत असून दोन धर्माच्या रिती, परंपरा, संस्कृती भिन्न असल्या तरी या संस्कृतींचा संगम घरात बाळ येणार म्हणून अधिक सुंदर होतो, माणुसकीचे ऋणानुबंध घट्ट होतात, असा संदेश या जाहिरातीतून दाखवला गेला आहे. या जाहिरातीच्या शेवटी सून अत्यंत भावूक होऊन सासूला विचारते, हा समारंभ तुमच्या घरात होत नाही नं? यावर सासू म्हणते, मुलीला खूष, समाधान, आनंदी करणारे सर्व रितीरिवाज प्रत्येक घरात होत असतात.

ही जाहिरात यूट्यूबवर प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडियातून पहिल्यांदा उत्स्फुर्त प्रतिक्रिया आल्या. ही जाहिरात भारताचे धार्मिक सौहार्द व्यक्त करणारी आहे, असेही बोलले जाऊ लागले.

पण बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने ही जाहिरात शरम आणणारी असून या जाहिरातीच्या कल्पनेविषयी काही प्रश्न नाहीत पण ज्या पद्धतीने ही जाहिरात दाखवली आहे त्याला माझा आक्षेप असल्याचे ट्विट कंगनाने केले आहे. ही हिंदू मुलगी दुसरा धर्म स्वीकारल्यानंतर क्षमा याचना केल्यासारखी का वागते? ती त्यांच्या दयेवर अवलंबून आहे का? स्वतःच्या घरात ती बावरलेली का आहे? असे प्रश्न कंगनाने आपल्या ट्विटमध्ये विचारले आहे.

संजय दीक्षित या अकाउंटने ही जाहिरात हिंदू-मुस्लिम धर्मातील सौहार्दाला काल्पनिक पद्धतीने दर्शवते. वास्तविक ही जाहिरात लव-जिहादचे प्रमोशन असून त्यातून राहुल राजपतचे प्रकरण आठवायला हवे, अशी टिप्पण्णी केली आहे.

(गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला दिल्लीत एका मुस्लिम मुलीशी मैत्री असल्याच्या कारणावरून राहुल राजपूत याची हत्या झाली होती.)

स्क्रीनरायटर अनिरुद्ध गुहा यांनी तनिष्कच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, भारत एकीकडे कोविड-१९ या भयंकर विषाणूचा सामना करत असताना जी जाहिरात धार्मिक एकोपा राखण्याचा संदेश देत असते त्या जाहिरातीलाच मागे घेण्याची वेळ आपल्यावर दुर्दैवाने येते.

आपण जाहिरात का मागे घेतली याचे स्पष्टीकरण टायटन व तनिष्कने रात्री उशिरा दिले.

“ही फिल्म आमचे कर्मचारी, सहकारी आणि स्टोअर स्टाफ यांच्यासाठी चांगल्या उद्देशाने तयार करण्यात आली होती. या आव्हानात्मक दिवसांमध्ये विविध क्षेत्रातील लोक, स्थानिक समूह आणि कुटुंबांनी एकत्र येऊन उत्सव साजरा करावा, हा ‘एकत्वम अभियान’चा उद्देश आहे. या फिल्मवर भडक स्वरूपाच्या प्रतिक्रिया आल्या, ज्या फिल्म तयार करण्याच्या उद्देशाशी विपरीत स्वरूपाच्या आहेत. या प्रकारच्या अनावश्यक भावना आणि उद्रेक पाहता आम्ही दु:खी आहोत. आमचे कर्मचारी, सहकारी आणि स्टोअर स्टाफ यांच्या भल्यासाठी आम्ही ही फिल्म मागे घेत आहोत,” असे त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: