व्हॉट्सअपकडून २० लाखाहून अधिक खाती बंद

व्हॉट्सअपकडून २० लाखाहून अधिक खाती बंद

बंगळुरूः व्हॉट्सअप या सोशल मीडिया कंपनीने जुलै महिन्यात भारतातल्या २० लाख ४० हजार खात्यांवर बंदी घातली आहे. व्हॉट्सअपने बंदी घातलेल्या खात्यांची ही सं

फेसबुक खुला व पारदर्शी प्लॅटफॉर्म : मोहन
फेसबुक – भाजप यांचं साटंलोटं
फेसबुक आणि भाजपचे ‘घोस्ट’ जाहिरातदार

बंगळुरूः व्हॉट्सअप या सोशल मीडिया कंपनीने जुलै महिन्यात भारतातल्या २० लाख ४० हजार खात्यांवर बंदी घातली आहे. व्हॉट्सअपने बंदी घातलेल्या खात्यांची ही संख्या आजपर्यंतची सर्वाधिक आहे. गुरुवारी या कंपनीने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे.

भारताने माहिती तंत्रज्ञान कायदे कडक केले असून सोशल मीडिया कंपन्यांना त्यांचे मासिक अहवाल प्रसिद्ध करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार ही माहिती व्हॉट्सअप जारी केली आहे.

सोशल मीडियात वेगाने पसरणाऱ्या माहितीचा स्रोत कळावा अशी मागणी भारताची असून जून महिन्यात नुकताच या संदर्भात एक कायदेशीर प्रस्ताव सरकारने तयार केला आहे. या नंतर व्हॉट्स अपकडून झालेला हा मोठा निर्णय आहे.

व्हॉट्सअपने ज्या २० लाख ४० हजार खात्यांवर बंदी घातली आहे त्यातील १० लाख ४२ हजार खाती खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आली आहे. काही खाती तक्रारी आल्यानंतर बंद करण्यात आली आहेत. जुलै महिन्यात व्हॉट्सअपकडे ५७४ तक्रारी आल्या आहेत.

गेल्या जून महिन्यात व्हॉट्सअपने २० लाख २१ हजार खाती बंद केली होती. या खात्यांमधून फेक न्यूज, समाजात धार्मिक तेढ, विखार, मत्सर पसरवणारे मेसेज पाठवले जात असल्याचे व्हॉट्सअपचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0