पालनपूर : गुजरातमधील बनासकंठा जिल्ह्यातील ठाकूर समाजाने अविवाहित मुलींना मोबाईल वापरास बंदी घातली आहे. त्याचबरोबर आंतरजातीय विवाह केल्यास मुलीच्या आई-
पालनपूर : गुजरातमधील बनासकंठा जिल्ह्यातील ठाकूर समाजाने अविवाहित मुलींना मोबाईल वापरास बंदी घातली आहे. त्याचबरोबर आंतरजातीय विवाह केल्यास मुलीच्या आई-वडिलांना दंडाची शिक्षा सुनावली आहे.
१४ जुलै रोजी बनासकंठा जिल्ह्यातील दांतीवाडा तालुक्यातील १२ गावांतील ठाकूर समाजातील सुमारे ८०० नागरिक उपस्थित होते. यात ज्येष्ठ नागरिक, तरुण व काही संघटनांचे प्रतिनिधी होते. या सर्वांनी एकमुखाने अविवाहित मुलींना मोबाइल वापरण्यास बंदी व आंतरजातीय विवाहास बंदी घालण्याचे फर्मान काढले. विवाहांमध्ये डीजे, रोषणाई, मिरवणूक यावर वारेमाप व अनावश्यक खर्च होतो त्यावरही या समुदायाने हरकत घेतली आहे.
ज्या मुलीचा आंतरजातीय विवाह होईल त्या मुलीच्या आई-वडिलांना दीड लाख रु. तर मुलाने असा विवाह केल्यास त्याच्या पालकांना दोन लाख रु.चा दंड द्यावा लागेल असाही नियम करण्यात आला आहे.
मुलींचे लक्ष अभ्यासात राहावे म्हणून मोबाईल बंदी घातली आहे असे सुरेश ठाकूर या एका नेत्याने सांगितले. तर काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले आमदार अल्पेश ठाकूर यांनी अविवाहित मुलींच्या मोबाईल बंदीबाबत भाष्य केले नाही पण विवाह समारंभातील अनावश्यक खर्च टाळल्यास तो मुलींच्या शिक्षणासाठी उपयोगी पडू शकतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
काँग्रेसचे आमदार गनीबेन ठाकूर यांनी अविवाहित मुलींना मोबाईल बंदी करण्यात काहीच गैर नसल्याचे स्पष्ट केले. तंत्रज्ञानापासून दूर राहिल्यास अभ्यासावर लक्ष केंद्रीत होण्यास मदत होईल असे ठाकूर यांनी मत व्यक्त केले. माझ्याकडे अनेक पालक आपली मुलगी अन्य जातीतल्या मुलासोबत पळून गेली अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन येत असतात. गेल्या महिन्यात अशा १० घटना घडल्या की ज्यामध्ये मुलींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्या होत्या. हे असे चित्र पाहता या नियमात काहीच गैर नाही असे ठाकूर म्हणाल्या.
काही दिवसांपासून बनासकंठा जिल्ह्यात आंतरजातीय विवाहांची संख्या वाढली होती. त्यामुळे अशा विवाहास बंदी घालण्यासाठी ठाकूर समाज पुढे आला आहे.
मूळ बातमी
COMMENTS