अनेक वेळा टीका होऊनही कोणाचाही राजीनामा घ्यायचा नाही, असा अलिखित नियम पाळणाऱ्या भारतीय जनता पक्षाने गेल्या सहा महिन्यामध्ये विविध राज्यांचे पाच मुख्यमंत्री बदलले आहेत.
अनेक वेळा टीका होऊनही कोणाचाही राजीनामा घ्यायचा नाही, असा अलिखित नियम पाळणाऱ्या भारतीय जनता पक्षाने गेल्या सहा महिन्यामध्ये विविध राज्यांचे पाच मुख्यमंत्री बदलले आहेत.
२०१४ मध्ये केंद्रात सत्तेत आल्यावर कितीही विरोध आणि टीका झाली, तरीही राज्यांचे मुख्यमंत्री अथवा केंद्रीय मंत्री बदलण्याचे टाळणाऱ्या भारतीय जनता पक्षाने गेल्या सहा महिन्यांमध्ये विविध राज्यांचे पाच मुख्यमंत्री बदलले आहेत. भारतीय जनता पक्षाने उत्तराखंडमध्ये मार्च महिन्यात त्रिवेंद्रसिंह रावत यांना हटवून तिरथसिंह रावत यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती. लोकसभा सदस्य असलेल्या रावत यांना सहा महिन्यांच्या मुदतीत विधानसभेवर निवडून येणे शक्य नसल्याने अवघ्या ११४ दिवसांमध्येच रावत यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. पुष्कर सिंह धामी यांची जुलैमध्ये मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत उत्तराखंडमध्ये भाजपाने दोन मुख्यमंत्री बदलले.
आसामध्ये यावर्षी मे महिन्यात भाजपा पुन्हा सत्तेत येताच अगोदरचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना बदलून हेमंत बिश्वा सरमा यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली होती. चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषविताना दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला त्याच दिवशी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना राजीनामा देण्यास पक्षाने भाग पाडले होते आणि बसवराज बोम्मई यांची निवड करण्यात आली. आता गुजरातमध्ये पुढच्यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. सव्वा वर्ष राहिले असतानाच अचानक विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रीपदावरून काढून टाकण्यात आले असून, भूपेंद्र पटेल यांची गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.
भाजपने मुख्यमंत्री बदलताना कोणतीही करणे दिलेली नाहीत. तर पक्षाचा आदेश असल्याचे प्रत्येक पायउतार होणाऱ्या मुख्यमंत्र्याने सांगितले असून, प्रत्येकाने मोदींचे जाता जाता आभार मानले आहेत. मात्र पक्षामध्ये बेबनाव, वादावादी, लोकांची नाराजी, अकार्यक्षमता अशा कारणांमुळे भाजपला मुख्यमंत्री बदलावे लागले आहेत.
COMMENTS