महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा मुद्दा घटनापीठाकडे

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा मुद्दा घटनापीठाकडे

दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा मुद्दा आता घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने घेतला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन

आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी सोमवारी
मविआ सरकार अडचणीत
विशिष्ट स्कूलबसची सक्ती करणाऱ्या शाळांची चौकशी करणार

दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा मुद्दा आता घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने घेतला.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखाली न्या. हिमा कोहली आणि न्या. कृष्णमुरारी या तीन सदस्यांच्या खंडपीठासमोर आज आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी झाली.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा येत्या २६ ऑगस्टला निवृत्त होणार आहेत.

अरुणाचल प्रदेश सत्ता प्रकरणाचा उल्लेख करून सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सुनावाणीच्या सुरवातीलाच हा निर्णय दिला.

कपील सिब्बल यांनी शिवसेनेची बाजू मांडली.

यासंदर्भात पुढची सुनावणी येत्या गुरुवारी २५ ऑगस्टला होणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाच्या समोर शिवसेना पक्षाच्या निर्णयाची सुनावणी सुरू आहे. तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, असा निर्णयही न्यायालयाने दिला.

सर्वोच्च न्यायालयासमोर यासंदर्भात ५ याचिकांवर सुनावणी होत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0