राज्य शासन ३ चित्रपटांना कान्स चित्रपट महोत्सवात पाठवणार

राज्य शासन ३ चित्रपटांना कान्स चित्रपट महोत्सवात पाठवणार

मुंबई : ‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या तीन मराठी चित्रपटांची कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आल्याचे

मुंबईसह ४ विमानतळांचे उर्वरित हिस्सेही विकणार
डिजिटल मीडियावर अंकुश ठेवण्याच्या योजनेत पत्रकारही सामील
हाथरस तरुणीचा फोटो ट्विटरवर : भाजप आयटी सेलचा प्रताप

मुंबई : ‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या तीन मराठी चित्रपटांची कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी माहिती दिली.

कान्स (फ्रान्स) मध्ये १७ ते २८ मे दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय ग्राहक मिळवून देण्यासाठी तसेच देशातील चित्रिकरण व पर्यटन स्थळांचे महत्व वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) मध्ये विशेष प्रयत्न करण्यात येतात.

या वर्षी कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) २०२२ फिल्म मार्केटिंग विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून पाठवावयाच्या ३ मराठी चित्रपटांच्या निवड प्रक्रियेसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव अंतर्गत अशोक राणे, सतिश जकातदार, किशोरी शहाणे-विज, धीरज मेश्राम, मनोज कदम, महेंद्र तेरेदेसाई व दिलीप ठाकुर या ७ तज्ज्ञ सदस्यांची परिक्षण समिती तयार करण्यात आली होती. या समितीने ३२ चित्रपटांचे परिक्षण करुन एकमताने नटराज एन्टरटेनमेंट निर्मित “पोटरा”, नाईन आर्चस पिक्चर कंपनी निर्मित “कारखानीसांची वारी” आणि बीइंग क्रिएटिव्ह पिक्चर्स निर्मित “तिचं शहर होणं” या चित्रपटांची कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी केलेली शिफारस शासनाने मान्य केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0