अखेर सर्वोच्च न्यायालयाने टास्क फोर्स नियुक्त केला

अखेर सर्वोच्च न्यायालयाने टास्क फोर्स नियुक्त केला

ऑक्सीजन आणि औषधांचा पुरवठा योग्य रीतीने व्हावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे.

पोलिसांना महिला कार्यकर्त्याकडून हवी ५० लाखांची हमी
चीनकडून १० भारतीय सैनिकांची सुटका
राज्यातर्फे हजार कोटींचे कर्जरोखे

ऑक्सीजन आणि औषधांचा पुरवठा योग्य रीतीने व्हावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे.

देशभरामध्ये ऑक्सिजन आणि औषधांचा पुरवठा योग्य रितीने होत नसल्याच्या सतत तक्रारी येत आहेट. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे. त्यासंदर्भात आज न्यायालयाने एका टास्क फोर्सची स्थापना केली.

गेले अनेक दिवस सर्वोच्च न्यायालयामध्ये कोरोनाच्या संदर्भात नियमित सुनावणी सुरू असून, सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला वारंवार फटकारले आहे. राज्यांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. कोरोना स्थितीवर आमचे लक्ष आहे, असे न्यायालयाने सांगितले असून, आज ऑक्सिजन आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी १२ सदस्य असलेल्या टास्क फोर्सची स्थापना केली.

हा टास्क फोर्स केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागाशी स्वतंत्रपणे सल्ला मसलत करेल आणि आपली नियमावली तयार करण्यासही स्वतंत्र असेल, असे न्यायालयाने सांगितले.

५ मे रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने कर्नाटक राज्याला दररोज १२०० मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश केंद्राला दिले होते. त्या आदेशाला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची याचिका फेटाळली आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला.

टास्क फोर्स

  • डॉ. गगनदीप कांग, प्राध्यापक, ख्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तामिळनाडू
  • डॉ. देवी प्रसाद शेट्टी, चेअरपर्सन, नारायण हेल्थकेअर, बंगळुरु
  • डॉ. भबतोष विश्वास, माजी कुलगुरू, पश्चिम बंगाल आरोग्य विज्ञान विद्यापीठ, कोलकाता
  • डॉ. देवेंद्र सिंह राणा, चेअरपर्सन, सर गंगाराम रुग्णालय, दिल्ली
  • डॉ. जेवी पीटर, डायरेक्टर, ख्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तामिळनाडू
  • डॉ. नरेश त्रेहन, चेअरपर्सन, मेदांता रुग्णालय, गुरुग्राम
  • डॉ. राहुल पंडित, डायरेक्टर, क्रिटिकल केअर मेडिसीन अँड आयसीयू, फोर्टिस रुग्णालय, मुंबई
  • डॉ. सौमित्र रावत, चेअरमन, डिमार्टमेंट ऑफ गॅस्ट्रोअँटरॉलॉजी आणि लिवर ट्रान्सप्लांट, सर गंगाराम रुग्णालय दिल्ली
  • डॉ. शिव कुमार सरीन, वरिष्ठ प्राध्यापक, इंस्टीट्यूट ऑफ लिवर अँड बिलीरी सायन्स, दिल्ली
  • डॉ. जरीर एफ उदवाडिया, कन्सल्टेंट चेस्ट फिजिशियन, हिंदुजा रुग्णालय,मुंबई
  • सचिव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार
  • तसेच नॅशनल टास्क फोर्सचे संयोजक देखील या टास्क फोर्सचे सदस्य असणार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0