राज्यात ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजनचे उद्दीष्ट

राज्यात ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजनचे उद्दीष्ट

मुंबईः राज्यात ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्सा

वाढीव २०० मेट्रीक टन ऑक्सिजनची केंद्राकडे मागणी
गोव्यात : ऑक्सिजनअभावी आणखी १३ रुग्णांचा मृत्यू
राज्यात दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती

मुंबईः राज्यात ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

सद्यस्थितीत महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश कोरोना-१९ महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत आहे. त्यातच आगामी चार-पाच महिन्यात कोरोना-१९ विषाणू प्रादूर्भावाची तिसरी लाट येणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात प्राणवायूचा (Liquid Medical Oxygen) (LMO) तुटवडा निर्माण झाला आहे. राज्याची प्राणवायू निर्मितीची क्षमता सद्य:स्थितीत १,३०० मे.टन/प्रतिदिन असताना १,८०० मे. टन एवढ्या प्राणवायूची मागणी आहे. कोरोना-१९ प्रादूर्भावाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे ही मागणी २,३०० मे.टन इतकी वाढण्याची शक्यता आहे.

याकरिता राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या अनुषंगाने तातडीने ऑक्सीजन निर्मिती व साठा वाढविणे, क्रिटीकल गॅप शोधून कार्यवाही करणे, लॉजिस्टीक ट्रान्सपोर्टवर उपाययोजना करणे, इत्यादी उपाययोजना करून राज्य ऑक्सिजन निर्मिती क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी व आवश्यक ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्याकरीता, राज्यामध्ये “मिशन ऑक्सीजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहने मंजूर करण्याचा व याअनुषंगाने इतर उपाययोजना राज्यामध्ये निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0