टिक टॉकने अखेर गाशा गुंडाळला

टिक टॉकने अखेर गाशा गुंडाळला

टिक टॉक (Tiktok) व हेलो (Helo) या लोकप्रिय ऍपची मालकी असलेल्या चिनी कंपनी बायटेडान्सने भारतातील आपले कामकाज बंद करण्याचा अखेर निर्णय घेतला आहे. टिकटॉक

चीनमध्ये आता ३ मुलांचे धोरण लागू
व्हॉट्सअपवरील चिनी मृत सैनिकांची नावे टाइम्स नाऊवर
चीनची घुसखोरीः महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरीतच

टिक टॉक (Tiktok) व हेलो (Helo) या लोकप्रिय ऍपची मालकी असलेल्या चिनी कंपनी बायटेडान्सने भारतातील आपले कामकाज बंद करण्याचा अखेर निर्णय घेतला आहे. टिकटॉक्सच्या एक प्रमुख अधिकारी वेनेसा पापास व ब्लॅक शँडली यांनी आपल्या सहकार्यांना एक इमेल पाठवला असून त्यात त्यांनी भारतातील आपल्या कंपनीचे कर्मचारी कमी करण्याबरोबर भारतातील कामकाज बंद करणार असल्याचे म्हटले आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे भारतातील २ हजार कर्मचार्यांचा रोजगार गेला आहे.

या इमेलमध्ये असेही म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत भारतात कामकाज करता येणे अशक्य आहे, सरकारने घातलेल्या बंदीविरोधात प्रयत्न सुरू होते. सरकारच्या अटी शर्तींचे, कायद्यांचे पालन करण्याविषयीही सतत चर्चा सुरू होती, पण त्याला सध्या यश दिसत नसल्याने अनिश्चिततेच्या काळात आम्ही कंपनीचे कामकाज बंद करत आहोत. भारतात पुन्हा केव्हा येणार याची माहिती नाही पण भविष्यात आम्ही येथे येऊ असा विश्वास या पत्रात व्यक्त करण्यात आला आहे.

लडाखमधील चीनच्या घुसखोरी नंतर भारत सरकारने ५९ चिनी ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गेल्या वर्षी जूनमध्ये टिकटॉक व हेलो ऍप बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर सुमारे सहा महिने कंपनी व्यवस्थापन व सरकार यांच्यात वाटाघाटी चालल्या होत्या. या दरम्यान भारतीय कर्मचार्यांना कंपनी मदत करत होती. कंपनीने कर्मचार्यांच्या खर्चात कपात केली होती पण त्यांना पगार दिला जात होता. पण ऍप सुरू नसल्याने सर्व कर्मचार्यांना पगार देणे अशक्य असल्याने भारतातील सेवा बंद केल्याचे टिकटॉकच्या प्रवक्त्याने सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0